सिद्धार्थ आणि छन्न ...

Started by Kumar Sanjay, December 14, 2016, 10:28:00 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

हे प्रिय छन्न...

पाठोपाठ मज येण्यामागे
निष्ठा कळली मला तुझी
पंरतु माफ कर सेवका
काही नसे तुझ देण्याकरिता
तु हृदय जिंकले माझे
अाजन्म मनी राहिल नाव तुझे

जगी काही अपेक्षा असते
म्हणूनी जग उदारता दाखवते
या जीवनी निहॅेतुक, निस्वार्थी
असे प्रिय कुणीच नसते
पण एक अपवाद तु छन्ना !
यांत निस्वार्थ तु मिञा !

हे प्रिय राजसेवका ...

मित निष्ठेचा विरह सोसून जा
अन् हा घोडा घे आणि माघारी जा !!
प्रिय , कथन कर राजाला
मी क्रोधवश ना त्याग केला
ना मला स्वर्गाची अभिलाषा
संयोग कितीही दीर्घ नात्याला
वियोग प्रत्येकालाच तरी अाला

हे मिञा ...
 
सांत्वन करशील असे पित्याचे
होणार ना स्मरण गोैतमाचे
कथन करशील मम मातेला
ती श्रेष्ठतम माता जगीची
प्रिय , सिद्धार्थ अपाञ प्रेमाला
यशोधरे , किती साहसवान
ठरशील नेहमी जगी महान
लहान परी गोंडस राहुल बाळ
वियोग पित्याचा सांभाळ

जा ! प्रिय मिञा !
हा घोडा घे अन् माघारी जा !!!

कुमार संजय
7709826774