स्मार्ट वर्क

Started by sanjay limbaji bansode, December 15, 2016, 10:14:59 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

एक राजा होता त्याला आपल्या शेतकरी प्रजेला स्मार्ट वर्क बद्दल सांगायचे होते.पण त्याच्या राज्यातील सारी प्रजा ही अडाणी असल्यामुळे त्यानी एक युक्ती लढवली त्यानी एका भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली सर्वाना एकत्र बोलाविले व त्यातील झाडे चढण्यास माहिर असलेले चारजन निवडले व एक राज्याचा माणूस असे पाचजन निवडले.
त्यांना सांगितले की, या आंब्याचे सर्व आंबे हे हातांनी तोडायचे, कुणी जास्त तोडले की कमी याला महत्व असणार नाही जो या आंब्याचा शेवटचा आंबा तोडेल तोच जिंकेल. तसा तो आंबा मोठा असल्यामुळे त्याला आंबेही पुष्कळ होती.
राजाने सांगितल्या प्रमाणे सर्वानी होकार देऊन कामाला सुरवात केली ते पाचहिजन आंब्यावर झरझर चढले व त्यातील चार जणांनी आंबे तोडाण्याचा झपाटा चालू ठेवला.पाचवा मात्र जो राजाचा माणूस होता तो  एका फांदीवर बसून आरामात त्यांची मजा पहात होता.त्यानी एकही आंबा तोडला नाही .
दोन तास झाले होते झाडावरचे आंबे जवळ जवळ संपतच आले होते त्यामुळे सर्वानी झाडावर एक नजर मारली. कुठल्या कुठल्या फांदीवर आंबे शिल्लक राहिले का ते बघायला. तेंव्हा त्यांना दिसले की आंब्याच्या शेंड्याच्या फांदीवर तीन आंबे शिल्लक राहिले. पण त्यांचा प्रॉब्लेम हा झाला की, दोन घंटे चिकाटीने एक एक आंबा तोडल्यामुळे  त्यांची सर्व शक्ति संपली होती.त्यांचे हात पाय गळून गेले होते त्यांना आता या फांदीवरून त्या फांदीवर जाने अशक्य झाले होते.हे सारे राजांनी दिलेला माणूस बघतच होता. तो दोन घंटे एकाच फांदीवर आराम करीत असल्यामुळे तो अजिबात थकला नव्हता.तो झटपट त्यांच्या समोरून त्या आंब्याच्या शेंड्यावर जाऊन ते दोन आंबे व शेवटचा आंबा तोडून खाली उतरून राजा जवळ दिला. शेवटी राजांनी त्याला विजयी घोषित केले व तो काही मेहनत न करता विजयी झाला.कारण राजाच्या अटीप्रमाणे शेवटचा आंबा जो तोडिल तोच या स्पर्धेत विजयी होईल.
हे सारे जनता बघत होती हे बघून काहीजण राजाला बोलले महराज आपल्या राज्यातील त्या चार माणसांनी खूप मेहनत घेतली आणी तुम्ही मात्र त्या तीन आंबे तोडणाऱ्याला बक्षीस दिले ज्यानी खरी मेहनत केली तोच  आमच्या मते या बक्षीसाचा पात्र आहे व ते चारजन आपल्या राज्याचे नागरिक आहेत.
तेंव्हा राजांनी हसत त्या सर्वाना उत्तर दिले,मी आपणाला यासाठीच येथे बोलाविले.आपणा सर्वाना असे वाटते की हा इसम ज्यानी शेवटचा आंबा तोडला तो बक्षीस घेण्यास पात्र नाही पण मित्रांनो त्यांनीच शेवटचा आंबा तोडल्यामुळे तोच या बक्षिसास पात्र आहे. कारण त्याने हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क केले. त्यांनी शक्ति वापरण्या पेक्षा बुद्धी वापरली व तो या स्पर्धेत जिंकला व असेच स्मार्ट माणसे जीवनाच्या स्पर्धेतही नेहमीच जिंकतात.
तुम्ही रोज गाढवासारखी मेहनत करता पण तुमच्या मेहनतीचे फळ भलत्याच वर्गाला मिळते. आज तुम्ही जे शेतात पिकवता ते काडीमोल भावात व्यापार्याला विकून टाकता पण तोच माल व्यापारी त्याचा योग्य तो वापर करून  तीन पट्टीने जास्त भावात शहर वासीयांना विकतात व करोडो रुपये कमवीतात व श्रीमंत होतात.
याचे एकच कारण की ते स्मार्ट वर्क करतात.तुम्ही पिकवलेली तूर, मूंग, उड़द व्यापाऱ्याला तीस, चाळीस रुपये किलोनी विकता व तो त्याची डाळ  बनवून तोच माल शंभर, दीडशे रुपये किलोनी बाजारात विकतात यालाच म्हणतात स्मार्ट वर्क. मित्रांनो आज जर तुम्ही त्यांच्याप्रमाणे स्मार्ट वर्क केला तर आयुष्यात हा शेतकरी कधी गरीब राहणार नाही.
जे तुम्ही पिकवता ते गहू, ज्वारी, तूर, मूंग, उड़द, सोयाबीन असे अनेक पिके एक शेतकरी संघटना स्थापुन जर तुमच्या हाताने शहरातिल लोकांपर्यंत पोचवली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल. उपासमारीची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही.
तर आजपासून कराल ना स्मार्ट वर्क !

sanjay bansode 9819444028