एक गृहस्थ.......

Started by sanjay limbaji bansode, December 15, 2016, 03:13:17 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

एक गृहस्थ, ज्याने आपल्या परिवारासाठी आणि आपल्या पोरा बाळासाठीच आपले जीवन अर्पण केले होते.
लग्नाला आठ वर्ष उलटून गेली होती. बायको व त्याच्यातला प्रेम नावाचा पंखा आता मोडकळीस येऊन भंगारात जमा झाला होता. आता तो पंखा त्याने चालू करण्याचा प्रयत्न केला तर तो पंखा त्याला प्रेमाची हवा न देता  शॉकच देत होता.
प्रेमाचं सार त्याच्या जीवनातून कधीच इतिहास जमा झाल होतं.
आता त्याचं त्या सूर्या सारखे रोजचे जीवनचक्र चालू होते. रोज वेळेनुसार उगवायचे आणि सायंकाळी माळवायचे.
त्याच प्रमाणे, रोज सकाळी उठायचे. आंघोळ करायची. कपड़े घालून ऑफीसला जाण्यासाठी तयार व्हायचं आणि डबां होईपर्यंत बायकोची कटकट ऐकायची.
वाढती महागाई, घरात अपुरा पडत असलेला त्याचा पगार. बायकोची नवनवीन सामान घेण्याची ईच्छा. मुलांचे आताचे स्कुल बदलून नवीन मोठ्या स्कूलमधे  टाकण्याची ईच्छा.
हे सारे ऐकून सकाळी सकाळीच त्याच्या डोक्याचे दही होने चालू होत  होते. तसेच डोके घेऊन तो ऑफीसला पोचत होता. ऑफीसला गेल्यावर त्या दही झालेल्या डोक्यात बॉस नावाच्या लाल भडक चटणीचा तड़का बसून त्या तड़क्याची आग त्याच्या पायापासून मस्तकापर्यंत जात असे.
संध्याकाळपर्यंत त्याची अवस्था त्या पावसाळ्यात पैदा होणाऱ्या दुधी केकड्या प्रमाणे होत असे.
चुकून ही कुणी त्याच्या शरीराला बोट लावले तर ते बोट त्याच्या शरीराच्या आरपार जाईल !
पहाड़ासारखा माणूस पण पूर्ण अवसान गळून गेलेला.
अशा अवस्थेत तो संध्याकाळी घराचे दार वाजवतो आणि दार उघडल्यावर त्याच्या बायको सोबत त्याच्या मुलांचेही त्याच्यावर शब्दरूपी आक्रमण होते.
असे बिना चवीचे त्याचे जीवन चालूच असते. आता त्यालाही या आळणी जीवनाची सवय झाली होती.
उंबराच्या किड्यांना माहीत असते आपले जीवन हे या छोट्याशा उंबरातच आहे. कितीही बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तरी आपला प्रयत्न असफलच.
म्हणून ते बाहेरच्या दुनियेची आशा न करता त्या उंबरातच सुखी राहण्याचा प्रयत्न करतात.
हाही त्यांच्याप्रमाणेच त्या दुखाने बरबटलेल्या जीवनातच जगत होता.व आपली स्वप्ने त्यागून आपल्या बायका, पोरांच्या स्वप्नांसाठी रात्र दिवस धडपड करीत होता.
पण अचानक त्याच्या जीवनात एक आशेचा अंकुर जन्म घेतो.त्याच्या जीवनाच्या काळ्या अंधकारात अचानक LED लाईट पेटतो.
त्याच्या  प्रेम नावाच्या मोडलेल्या लाकडाच्या  झोपड्या समोर अचानक प्रेमाच्या सीमेंट विटा येऊन पडतात.व त्याचा भंगारात पडून असलेला प्रेम नावाचा पंखा पुन्हा जोरजोऱ्यात फिरू लागतो.
कारण,
त्याच्या घरा शेजारी एक नवीन सुंदर पाखरू रहायला आलेले असते. आणि त्या सुंदर पाखरानी याच्या प्रेमाचा होकार कबूल केलेला असतो.
पुन्हा एकदा तो प्रेमात तल्लीन होतो. आता त्याला कशाचीही गरज नसते.तो आता बायकोची भणभण, मुलांची कटकट, बॉसच्या शिव्या, वाढती महागाई आनंदात झेलत असतो.
कारण, त्याला आता जीवन जगण्याची एक नवसंजीवनी मिळालेली असते.त्यातच तो बेधुंद होऊन जीवन शोधतो.
दुनियाची पर्वा न करता.
ते दोघे आता एकमेकाचे जीव की प्राण झालेले असतात.
ते दोघे आता एका नव्या रस्त्याने चालले होते.तो रस्ता अरुंद  होता. बदनामीने बरबटलेला होता.
ते एका भरकटलेल्या रस्त्याने जात होते. त्या रस्त्याला कुठलीही दिशा नव्हती त्यांनी बदनामीचा  दिशाहीन रस्ता पकडला होता.
कधीतरी याच्या बायको समोर  आणि तिच्या नवऱ्या समोर या दोघांचे पितळ उघडे पडणारच, याची त्या दोघांनाही जाण होती.
तरीही ते दोघे दुनियाची पर्वा न करता. एका नवीन दुनियेत रंगून गेले होते.
(टिप :- ही कहानी काल्पनिक आहे. या कहानीचा संदर्भ माझ्या जिवनाशी जोडू नये )
sanjay bansode 9819444028