बकरा......

Started by sanjay limbaji bansode, December 15, 2016, 03:15:21 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

**बकरा **
मी काल एका शेतकऱ्याच्या शेतात बकरा बघितला होता.
तो त्या हिरव्यागार रानात मनसोक्त संचार करीत होता.
हव्या त्या झुडपाच्या फांद्याचे लचके तोडत होता.
खेळत होता, बागडत होता, हसत होता,गात होता.
तोच  बकरा  आज मी खाटकाच्या कत्तलखाण्यात बघितला  !
अशांत, दुःखी, दुसऱ्या बकऱ्यांची कत्तल आपल्या डोळ्याने बघून तशीच आपलीही कत्तल होईल या भयाने घाबरलेला.
मिनटें मिनीटे,सेकंद सेकंद मरण त्याच्या जवळ आकांततांडव करीत येत होते.
तो ओरडत होता, किंचाळत होता, पायात बांधलेल्या दोर तोडण्यासाठी प्रयत्न करीत होता.
पण त्याची दया कुणालाही येत नव्हती.
एकाएकी मरण आलेले वेगळे. पण डोळ्यासमोर दिसणारे मरण फार भयानक !
त्याला बघून सारे खाटीक आनंदात बोलत होते. आज चांगला हाडामासाचा बकरा मिळाला. आज धंदा भरपूर होणार !
त्याचे मरण निश्चित होते. पण शेवटपर्यंत प्राण वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरूच होती,
शेवटी त्याच्या मानेवरती तलवार चाल करून आली आणी क्षणात त्याची मान त्याच्या धडापासून वेगळी केली.
आता त्याचे मृत शरीर पाव, अर्धा, किलो किलोनी घरात घरात जाईल व आनंद देईल.
त्याच्या मरणाच्या दुखापेक्षा आम्हांला आनंदच जास्त होईल.
90 ml पोटात ढोसुन आम्ही आनंदात बायकोला बोलू, डार्लिंग ..
काही बोल, पण आज तु मटण फार छान आणले !
त्यावर बायको उत्तर देईल,
मेला दोन आठवडे मेंढीच मटण देत होता.त्याला मी ठणकावून सांगितले.
हे बघ !
जर पुन्हा तु मेंढीचे मटण दिले तर आजपासून दुसऱ्या दुकानात जाईन.
त्यावर आमचे उत्तर असणार,
व्वा ...बायको असावी तर अशी !
तो बिचारा बकरा मात्र शेवटी  बकराच बनला !

sanjay bansode 9819444028