वीर 500 महाराला क्रांतीकारी जय भीम

Started by sanjay limbaji bansode, December 15, 2016, 03:18:38 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

1 जानेवरी 1818 या साली ईस्ट इंडिया या  ब्रिटिश कंपनीच्या नेतृत्वाखाली झालेले युद्ध.
या युध्दात 500 महारानी 28000 हजार पेशव्याला भुईसपाट केले.
त्यांना हरवून विजय प्राप्त केला.
जेंव्हा जेंव्हा 1जानेवारी येते तेंव्हा तेंव्हा माझ्या मनाला  एक प्रश्न नेहमीच सतवतो.
मराठी झेंडा अटकेपार नेण्यासाठी ज्या मर्द महारानी नेहमीच मदत केली, ते महार अचानक पेशव्याविरोधात का उभे ठाकले ?
मराठी मातीशी मराठी जातीशी इमान इतबार राखणारे महार अचानक आपल्याला (पेशव्याला ) सोडून परकीयाच्या (गोर्याच्या )छावणीत का गेले ?
काय, महार देशद्रोही होते ?
कारण, पेशवाई ही महारामुळेच संपली आणी ब्रिटिशांनी पूर्ण भारतभर कब्जा केला.
खरे तर या प्रश्नाचे उत्तर माझ्या अल्पशा बुद्धीलाही मिळण्यासाठी जास्त उशीर नाही लागला.
शिवाजी महराजांनंतर पेशव्यांनीच मराठेशाही संपुष्टात आणली यात तीळमात्र शंका नाही.
आणी या पेशवाईत महार जातीला काय कीमत होती हे साऱ्या जगाला माहीत आहे.
पेशव्यांनी महार जातीचे अतोनात हाल केले. त्यांच्या सावलीने व थुंकिने जमीन बाटू नये म्हणून त्यांच्या कमरेला खराटा व गळ्यात मडके दिले.
ही पेशवाईत महार जातीला दिलेली सजा होती. त्यांचा गुन्हा येवढाच की ते महार या शूद्र जातीत जन्मा आले. त्यांना जनावरापेक्षा त्रासदायक जीवन जगण्यास मजबूर केले.सरेआम त्यांच्या बायका मुलींची अब्रू लुटल्या जाई.
शिवाजी महाराजाच्या काळात महार जातीला किल्लेदार बनवल्या जात होते. इतर दुसऱ्या मावळ्यांसारखा त्यांनाही मान सम्मान दिल्या जात होता.
पेशवाईत मात्र चित्र वेगळेच होते. महार कितीही शूर वीर असला कितीही बलवान असला तरी त्याची कीमत शून्य होती. त्याला कसलाही मान सम्मान नव्हता.
दिवसा त्याला गावात फिरण्यास मनाई होती.स्वराज्याचा स्वाभिमान बाळगणाऱ्या महाराला पेशवाईत फक्त युद्धा पुरतेच वापरत होते आणि काम झाल्यावर जानवरा प्रमाणे लाथ मारुन सैन्याच्या बाहेर हाकलीत होते.
या साऱ्या गोष्टीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की महार ब्रिटिशांच्या कुठल्याही आमिषाला भाळून ब्रिटिश सैन्यात दाखिल झाले नव्हते तर पेशव्यानी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी, पेशव्यांची पेशवाई संपविण्यासाठी पेशव्या विरुद्ध उभे ठाकले होते.
ते या युद्धात जीवाची पर्वा न करता, भुकेल्या वाघासारखे 28000 सैन्यावर तुटून पडले व विजय प्राप्त केला.
खरे तर या मर्द महार सैन्याचे सर्वच बहुजनानी आभार मानायला पाहिजे.
हे 500 महार लढले म्हणूनच पेशवाई संपली.
पेशवाई संपली म्हणून गोरे  आले आणि शूद्रासाठी शाळा खुल्या केल्या.
शुद्रासाठी शाळा सुरू केल्या म्हणूनच महत्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर सारखे महापुरुष आपल्या जातीत जन्मा आले आणि आपली ब्राह्मणवादातून कायमची सुटका केली.
अशा या वीर 500 महाराला माझा क्रांतीकारी जय भीम
sanjay bansode 9819444028