कविता II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

Started by siddheshwar vilas patankar, December 17, 2016, 01:56:56 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


भ्रम कैवल्याचा साधला

भक्ती नामातच तू बांधला

कुणी पहिला रे तुला

दगडामध्येच अडकला

खांब सोनेरी रुपेरी

तरी उभा विटेवरी

बडवे मातले ते सारे

उगा भक्तांसी छळेऱे

दावा कोरी नोट त्यांसी

बनवून माऊलीस दासी 

बडवे  राजभोग भोगती

तुझा दरबार पातला,

दुर्लभ भक्त दर्शनासी

स्वतः समजून ते राजे

शिवीगाळ गाभारा माजे

कैसी शिस्त नाही जाण

कोऱ्या नोटेस फक्त मान

तुझ्या दरबारी विठुराया

फक्त लक्षुमीची छाया

हात सोड कटेवरचे

उचल बडव्यांशी लढावया


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C