“याद न जाये “

Started by शिवाजी सांगळे, December 20, 2016, 03:35:49 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

"याद न जाये "

आठवणींचा कॅलिडोस्कोप म्हणा किंवा पिसारा म्हणा, तो प्रसरणच पावत असतो, कधी बालपणातील, कधी तारुण्यातल्या तर कधी काल परवा घडलेल्या साऱ्या चांगल्या वाईट घटनांचा आलेख डोळ्यां समोर तरळून जातो. त्या मुळेच कदाचित आयुष्य चवदार आहे असं म्हणावं लागेलं.

१९६३ सालच्या 'दिल एक मंदिर' चित्रपटातील गीतकार शैलेन्द्र, गायक मोहम्मद रफी व संगीतकार शंकर जयकिशन याचं अगदी असचं जुन्या आठवणी जाग्या करणारं काहीतरी हातून निसटलेलं आठवून देणारं एक गाणं...

"याद न जाये बीते दिनों की
जा के ना आये जो दिन,
दिल क्यों बुलाये, उन्हें दिल क्यों बुलाये?"

मागे वळून पाहता सहज आठवणारं विरह गीत, कधीही न विसरता येणारऱ्या जुन्या दिवसां बद्दल शैलेन्द्रजी म्हणतात ते दिवस जर पक्षी असते, तर त्यांना मी पिंजऱ्यात सुखरूप जपून ठेवले असते व मोतीचारा भरवला असता व कायम हृदयाशी लावून ठेवले असते. काय सुंदर कल्पना केली आहे शैलेन्द्र यांनी.

"दिन जो पखेरू होते, पिंजरें में मैं रख लेता
पालता उनको जतन से, मोती के दाने देता
सीने से रहता लगाये...."

या साऱ्या आठवणी अन्य  कुठल्या नसून प्रेयसी बद्दलच्याच आहेत हे स्पष्ट करतांना  शैलेन्द्रजी म्हणतात, जरी मी तीचा फोटो कुठेही लपवून ठेवला तरी काही होणार नाही, तीची तस्वीर लपविता येईल पण माझ्या मनात असलेली तीची मुर्ती काहीही केल्या पुसली जाणार नाही,  जरी म्हणायला ती आज परकी आहे. 

"तसवीर उनकी छूपा के, रख दूँ जहाँ जी चाहे
मन में बसी ये सूरत लेकिन मिटे ना मिटाये
कहने को हैं वो पराये...."

   ईतक्या मोजक्या, साध्या सोप्या व सरळ भाषेत शैलेन्द्रजीनीं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ज्या आज पाच दशकं उलटून गेली तरी प्रत्येक विरही प्रेमिकांच्या व्यक्त होणाऱ्या भावना अश्याच असतील यात शंका नाही. इतकी सुंदर शब्दरचना त्याला शंकर जयकिशन यांनी लावलेली तितकीच सुंदर चाल आणि रफी साहेबांचा दर्द भरा आवाज म्हणजे सोने पे सुहागाच होय. अशी अवीट गाणी कधीच स्मरणातून जाणार नाहीत हे मात्र खरं आहे.

=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे. +919422779941/+919545976589 Email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९