शेतीमाती

Started by shamtarange, December 24, 2016, 09:40:08 AM

Previous topic - Next topic

shamtarange

रात्री भरताना पाणी
पायाखाली आला साप
गेला काळजाचा ठोका
ओठी आला मेला बाप...
क्षणभर डोळ्यापुढे
झाला अंधार अंधार
कशी करायची शेती
मृत्यू येता जिवावर..
कष्ट ओढता ओढता
स्वप्न सुखाचे पाहिले
मुलबाळं कच्चा आवा
छत घराचे राहिले...
शेती काळजाने काळी
घेते लेकरांचा बळी
किती पिकवले तरी
झोळी भुकेली भुकेली
पिकवून शेतीमाती
जग रडीच खेळते
शेती धरता डसते
साप होऊन फिरते....


https://marathikavy.wordpress.com/