वाटा

Started by shamtarange, December 24, 2016, 10:03:29 AM

Previous topic - Next topic

shamtarange

कोणाला देश वेगळा हवा
कोणाला हवेत राज्य
कोणाला जिल्हा वेगळा,
तर कोणाला तालुका विभाज्य
कोणाला हवी ग्रामपंचायत
कोणाला हवी सोसायटी
कोण भांडतो चौकात,
तर कोणी गल्लीसाठी..
कोणाला हवे अंगण
कोणाचे घरासाठी भांडण
कोणाला हवे कुटुंब
तर कोणी करतो खंडण..
शिवार वाटण्यासाठी भांडणारे,
गटासाठी उभे राहतात..
एकराचे वाटे झाल्यावर,
विहिरीचे पाणी वाटतात..
आई बापातून वाटल्यावर,
झोपायच्या जागा वाटून हव्या...
नवरा-बायकोलाही कपाटाच्या,
कप्प्यानुसार हव्यात चाव्या..
टोपल्यातील एक भाकरी,
ताटात हवी वाटून वाटून...
मरतानाही वाटून मरतो,
एकत्र राहणार कुठून..
.
माणूस जन्मातच स्वार्थी,
संस्काराने घडत जातो..
अंगवस्त्रावरील खिशांचेही,
फायद्यासाठी वाटे करतो...
एका शरीराचेही डावे उजवे,
आतल्यासह वाटे केलेत..
वाटे करून वाटे संपले
वाटण्याचे विचार उरलेत...
एक व्हायला नि राहयला,
समायोजनाचा सार लागतो..
स्वार्थ बाजूला ठेवण्या गड्यानो,
विश्वासाचा अधार लागतो..
अशोक क. गायकवाड
पारळकर. वैजापूर, औरंगाबाद
7588812376

https://marathikavy.wordpress.com/