लोकल

Started by swaps.sakpal@gmail.com, December 27, 2016, 02:06:40 PM

Previous topic - Next topic

swaps.sakpal@gmail.com

थोडस लिहलय आवड़ल तर नकी Like करा

                         **लोकल**


आज आस वाटतय माझ्या आयुष्यातील मोठी लढाई आहे. आणि ती कशी जिंकायची आसा विचार करता करता मी बांद्रा स्टेशनला विरार ट्रेनची वाट बघत होतो. विरार ट्रेनमध्ये चढायचं म्हणजे लढाईचा पहिला पाढाव जिंकन्या सारख.... विचारात मग्न असतानाच इंडिकेटरवर ट्रेन येण्यास तीन मीनीट राहील... हृदयाचे ठोके वाढू लागले. मी पाण्याची बाटली, छत्री, डबा सगलं बगेत टाकुन बैग पूढे लावली... थोडासा पूढे सरसावलो बाजूला पाहीलं तर माझ्या पेक्षा डबल उंचीचा माणुस, आयला हा तर माझ्या पूढेच चढनार... बर आहे याच्या मागे चढून याच्या पाठीच लपाव असा विचार केला, पण जर हा माझ्या मागे चढला तर मग जाम दाबणार मला... बाबा कसं होईल माझं, आजुबाजुला आता सगळेच जमले, प्लँटफाँर्म जाम झालं, सगळ्यांनी बँगा पुढे लावलेल्या बुलेटप्रुफ जँकेट सारख्या...
आसं वाटतय चर्चगेट वरून आतंगवादी येणार, ट्रेनमध्ये त्यांच्यापासुन बचावासाठी सगळी ही खटपट...एक मिनीट राहिल...मी थोडा पूढे सरसावलो, ठोके धडधड करू लागले...च्यामारी एवढी माणसं एका डब्यात कशी मावणार... माझा नंबर लागेल का? यांना सगळ्यांना मात देऊन मी आत जाईन? काय खर नाय राव आज माझं, बोंबलासारख शरीर माझं फ्राय होणार वाटतं... आली रे आली ऐकाने आवाज दिला, मी भानावर आलो... मी एकदम मन घट्ट करून रेडी झालो आणि उडी मारली अरे बापरे आत आर्धी लढाई जिंकली, पाठून जोर वाढला...दे धक्का...बापरे पाट आणि पोट एक झालं... दोन्ही हात वरती, बँग पोटात जाते की कायं असं वाटायला लागलं...
स्टिल चा डब्बा पोटात रुतु लागला ,मागचा माणसाचा डब्बा पाठित शिरनार,, चा मायला दोन डब्बे माझ्या शरीरातुन आर पार होउंन एकमेकांना भेटणार वाटत ...
      त्या स्तिथित ट्रेन चालू झाली थोड़ी हवा लागली! चेहर्यावरंच पानी हवेणी तोंडात गेल घामाची चव काय असते ती आज कलाली..पाठुन आवाज चलो भाई ..चलो अंदर ..आरे अंदर आरे काय चलो एक पाय नहीं हिल रहा हे ,और अंदर चलो खूपच फोर्स आला मागून सेटिंग वापस विखुरली, मान वाकड़ी झाली ती डायरेक्ट एकाचा काखेत घुसली...आरे बाप रे श्वास गुदमरला एवढा घान वास ! जस काय घटाराच झाकन ओपन केलय कुनी... काय काम करतो हा काय माहित? त्यात भावानी हाफ शर्ट घातलय.. मी तर वासाने मरनार वाटत आज, डिवोचि बोटल पुर्ण त्याचा काखेत ओतविशि वाटली.
अंधेरी आल 10-12 जन अजुन चडली आत...
एक मिनीटात मी आत पोहचलो गल्लीतुन डायरेक्ट बेडरूममधे...बीना हात पाँव हिलाये सरकार अदरं पहुंचे..
आत माधली परिस्थिति थोड़ी वेगळी होती, सगळे सावकार एरफोन लाऊन अरामात सिनेमा बघत होते. दोन सिटचा मधे 2-3 जण अरामत उभे राहिले असते मी जरा फूढे व्हा ना ! तर काय बोलला नाहीं तो
राघानी बघितल फक्त , बाजुवाला आरे जाने दो भाई उनका ग्रुप हे....
   म्हजे ..जाचा हाती ससा तो पारधी.. बाकि काय सगळे आपले दोन हाथ वरती करुण बसलेल्याकड़े बघून गुटके गिलत होते. कौन उठतय का? कौन जागा देईल उठून??? थोड़ासा जरी टेकायला मिलाल तरि बस यार...
असा विचार करत उभे असलेले सगळे लाल गालत उभे होते ...
      बोरीवली आली चर्चगेट वरुण बसलेले उठले आणि गलिमधे उभे असलेले बसले ...
ही एक सिस्टमच काहीतरी छान केले... मानसांची मनुसकी अजुन जीवंत आहे...
     आरे हा दोघे जन उठले नाहीत झोपायच सोंग करुन बसून राहिले मग त्यांच्यावर कमेन्ट सुरु झाल्या
1) आरे उठा नाहीतर मुलव्याध होईल..
2) शिट चिटकलि काय बो**ला ...
3)घरी घेऊन जा सीट झोपायला ...
4)मारताना पण सीट सोडनार नाय वाटत..
   थोडा मूड फ्रेश झाला कमेन्ट ऐकून
दीड तास कसा गेला काय कलाल नाय नालासोपारा विरार ची बॉर्डर आली 75% डब्बा खाली झाला मी ही सीटवर बसलो मस्त वाटल
  विरार ला उत्तरलो तेव्हा तोंडावर हसू आल आणि लक्षात आल आरे आपन विरार ला शिफ्ट झालो ...
    आता रोजच.....😰
स्वपनिल गंगाराम सकपाल
९९८७८२७८७८
Swaps.sakpal@gmail.com

budhabhushan salve

ति सध्या काय करते हा
विषय प्रेमकवितेवर
घेतला नसून तो एका
वेश्याव्यवसायास बळी
पडलेल्या महिलेवर घेतला
आहे त्यावरीलच ही रचना....

_________________________

●____ति सध्या काय करते____●

उसवलेल्या आयुष्याला
यातनांचे थिंगळे ति जोडते
थिंगळाना नयनअश्रुंचे
टाके घालुनी ति सांधते

पोटाची खळगी भरण्यासाठी
मनातल्या भावनांना ति मारते
अंधाऱ्या राती रातकीड़ाबनुनी
प्रकाशाला शोधत ति फिरते

भूणभूणणाऱ्या भुंग्यांना
सुडौल देहाने शांत ति करते
दारिद्रयाच्यां गड़गंज
बोजापायी आकांत ति करते

आतड़यांच्या मुळापासुनी
रोजच विषाला ति पचवते
टिचभर पोटासाठी स्वतःला
कावळ्याच्या हाती ति सोपवते

यातनांचे गाठोडे दूर सारूनी
साज श्रृंगाराने रात्र ति सजवते
मुक होऊन वेदनांचा चित्कारा
काळजाच्या कोपऱ्यात ति साठवते

विवस्र होऊन त्याची
ओंजळ सुखाने ति भरते
रक्तांने माखेलेली पाऊले
घेऊन काटेरी वाट ति चालते

अशा या मुर्दाड जगण्याला
अंधाऱ्या खोलीत अग्निडाव ति देते
ठंड झालेल्या राखेला मग
स्वतःच एकांतात ति सावड़ते

त्या वस्तितल्या झगमगाटाला
विसरूनी स्वतःचे पंख ति छाटते
अन् शेतातल बुजगावन होऊन
वेश्या बनुनी बाजारात ति वावरते
____कवी बुद्धभूषण साळवे____
        नाशिक-७०४००३४४६०