मिठी

Started by sanjweli, December 27, 2016, 03:31:32 PM

Previous topic - Next topic

sanjweli

१७/१२/२०१६.                         

रात्रीचा प्रहर सखे,
ये जवळी मिठीत जरा,
प्रणयाची ही रात असे,
रे कुंतली माळ मोगरा,

श्वासात श्वास ही गुंतू दे,
रंग अंतरंगी रंगु दे सारा,
तू नभी चांद लखलखे,
रे मजसी का दुरावा,
   
ओठ अजुन थरथरे,
अवखळही मंद गारवा,
रे गाल गुलाबी कसे,
नजरी नजर भिडवून पहा,
 
मधुर मिलनी गुंफू दे,
रे प्राजक्ताचा अमोघ सडा,
एकरुप एकचित्त होऊ दे
मदहोष ही आसमंत असा

हातात हात असु दे,
अधीर जीव मिलनाला,
अबोल प्रीती बहरु दे,
भेद मनीचा खोल सारा.

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३