वाढदिवस

Started by sanjweli, December 27, 2016, 03:39:23 PM

Previous topic - Next topic

sanjweli


११/१२/२०१६

मी अवतरलो,
आज तोच दिवस आहे,
निसटता प्रत्येक क्षण माझा,
साथ सोडुन जात आहे,

कसा बसा तरी जगतो,
वाटते मला काकस्पर्ष होत आहे,
चाळीशी कशीबशी गाठता,
आज शुभेच्छांचा होत वर्षाव होत आहे,

मागेच गेलो होतो,
आता भेटला हा पुनर्जन्म आहे,
ऋणी आहे मी कर्णग्रामातील प्रत्येकाचा
तुमचा पुरेपुर भेटला आशीर्वाद आहे,

मीच माझा आता रमतो,
मी पुजारी शब्दांचा
परोपकाराची परफेड
कशीबशी करत आहे
शब्दांसाठी वाहीला माझा,
प्रत्येक श्वास आहे.
© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३