==* असा हा मुंबई प्रवास *==

Started by SHASHIKANT SHANDILE, December 27, 2016, 03:52:17 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

असा तसा कसा तरी संपला प्रवास
कुठे सुंदर दृश्य कुठे घमंग वास
कुठे गार वारा जसा समुद्रकिनारा
कुठे पोस्टरांतून राजकीय ध्यास

असा हा मुंबई प्रवास

नोटबंदीत कित्येक मदतीला हात
कुठे पेटिएम कुठे डेबिटची रात
वेळेच्या तालावर नाचणारी माणसं
कुठे प्रांतवाद कुठे जातीला मात

असा हा मुंबई प्रवास

माथ्यावर कुंकू जणू हॉटेल ताज
गेटवे ऑफ इंडियाचे इथेच राज
मंत्रालय म्हणजे विरोधाचे नारे
नरिमन पॉईंट वर सेल्फीचा माज

असा हा मुंबई प्रवास

रस्त्यावर धावणारे वाहन हजार
जागोजागी लागे स्वस्त बजार
वडा पाव सोबत चहाचा प्याला
लोकलने माणूस झाला बेजार

असा हा मुंबई प्रवास

फॅशनच्या नावाने कापडी लहान
कुठे पाछ्यात्य कुठे भारतीय मान
आर्थिक क्षेत्रात जी भारताची शान
विविधतेने नटलेली मुंबई महान

असा हा मुंबई प्रवास
------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५९
दि.२७/१२/२०१६
Its Just My Word's

शब्द माझे!