सागर

Started by Sarita Nikam, December 27, 2016, 04:03:37 PM

Previous topic - Next topic

Sarita Nikam

सागर सागरास मोजत आहे
भरती ओहोटीची गिनती करता
काहीतरी शोधात आहे
सागराची खोली पाहत आहे
सागर सागरास मोजत आहे

रंगबदलू क्षितिजाकडे पाहत आहे
स्वतः मात्र स्तब्ध राहून
ध्येयाची खोली मापात आहे
सागर सागरास मोजत आहे

संपत्तीचा गर्व नाही
मालमत्ता सर्व नाही
गजबजलेल्या जगात या
स्वतःचाच शोध घेत आहे
सागर सागरास मोजत आहे
              .... सरिता