शब्द

Started by sanjweli, December 27, 2016, 07:56:34 PM

Previous topic - Next topic

sanjweli

शब्द
" शब्द माझी माता
शब्द माझा पिता
शब्द माझा दाता
शब्दामुळे मी जीता आहे
शब्द माझी व्यथा
शब्द माझी कथा
शब्द माझी कविता आहे !
शब्दांनी अस्र व्हावं
शब्दानी शस्र व्हावं
अन् माझं ह्रदय भेदावं,
टिपकणा-या रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन
कविता तू स्मरावीस,
कविता तू स्फुरावीस.
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३