एक गुलाबाच फुल....

Started by बुद्धभूषण गंगावणे, December 31, 2016, 01:03:35 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

एक गुलाबाच फुल....

एक गुलाबाच फुल

सगळ्या फुलांमध्ये वेगळ

एकट रुसुन बसलं होत

त्याला आपलसं करायचं होत..

नाजूक पाकळ्या, कोवळी पाने,

टोकदार काटे, स्वभाव, गुणधर्म

तरी हवहवसं वाटनार

त्याला आपलसं करायचं होत..

धो-धो पडणारा पाऊस

कजकडत्या उन्हात जनू

ते माझ्यासाठी उभे होते

त्याला आपलसं करायचं होत..

नजर हटत न्हवती माझी

ते ही टक लावून पाहत होते

शोध प्रेमाचा चालू आमचा म्हणून

त्याला आपलसं करायचं होत..

मनाची पक्की तयारी केली

बोलायचच आज हिम्मत केली

समजेल मन माझे माहीत नाही पण

त्याला आपलसं करायचं होत..

उदास होत ते कळलं होत

जवळ गेलो निरखून पाहिल

मन पाहत्याच क्षनी हादरलं

ते पहिलचं कोणाच तरी होत..

एक गुलाबाच फुल

आपलसं करायचं होत

जवळ जाताच कळलं

ते आधीच

" कोणाचं तरी होत"..
- बुद्धभूषण गंगावणे....
7738628059.