पायाचे ठसे

Started by ashrita vijay barse, January 01, 2017, 03:29:00 PM

Previous topic - Next topic

ashrita vijay barse

सुंदरश्या जीवनात जन्मलं एक बाळ... आईच्या कुशीत सतत राहणार... ते काचे सारखे निळे डोळे, छोटंसं नाक, छोटेसे ओठ, छोटी - छोटी बोटं, छोटेसे पाय... किती छान वाटतं ना... त्या बाळाला पाहुन... मन भरुन जातं... त्याचं ते जोर जोरात रडणं... रांगत रांगत घरभर चालणं... त्याच ते गोडं हसणं... त्याचे ते छोटेसे कपडे, सर्व काही... रांगत चालणाऱ्या बाळाला आईच्या दुधाची जास्त गरज असते... "जीवन देई मम बाळाला" हे शब्द ती खरी आईच जाणु शकते... जिने स्वतःच्या गर्भात ९ महिने स्वतःच्या बाळाला सांभाळून जन्म दिला... त्या वेदना, तो दिवस, तो क्षण... त्या वेदनेत स्वतःच्या बाळाला पोटात सांभाळणं... ती फक्त एक आईच सहन करु शकते... जेव्हा आई स्वतःच्या बाळाला जन्म देत असते तेव्हा त्या आईचा दुसरा जन्म असतो... म्हणतात की, घरात लहान मुलं आलं की, घरात आनंददायी वातावरण निर्माण होतं... प्रत्येक माणुस त्या लहान मुलासोबत खेळावस बघतो... त्या बाळासोबत खेळण्यात दिवस कसा जातो ते कळतच नाही..त्याचासोबत हसतो, बोलतो... पण ते मुलं एवढं छोटं आहे की, त्याला बोलताच येत नाही, मात्र बोलायचा प्रयत्न करतोच... आई बाबा हे सोपे शब्द ते बाळ पहिलं बोलतो... रांगत रांगत चालणाऱ्या बाळाला आईची जास्त गरज असते.. हळुहळु कळायला लागल्यावर आई समोर जरी नाही दिसली तर त्या बाळाचा जीव कावराबावरा होतो... आणि लगेच डोळ्यात पाणी येतं... कस असतं ना या लहान मुलांचं किती लगेच कळत त्यांना आपली आई कोण, बाबा कोण सर्व समजत... मग आईने फक्त जवळ घेतलं तरी मग शांत बसणार... आईची ऊब हि एक वेगळीच असते.. ज्यामध्ये ते लहान मुलं सुरक्षित असतं... लहान बाळ जेव्हा पहिल्यांदा चालायला लागत तेव्हा त्या बाळाचं पहिलं पाऊल पडत, तेव्हा त्याच्या आयुष्यातले खरे पायाचे ठसे उमटतात... पहिलं पाऊल प्रगतीचं आणि दुसरं पाऊल ध्येयाचं... असे हळूहळू पावले टाकुन आयुष्याच्या मार्गाने हे चिमुकल बाळ भरारी घेत असते... त्याचे जसे पायाचे ठसे उमटतात तसे आयुष्याचा दृष्टिकोन बदलत जातो... व त्याच्या नाजुक, कोमल पायाच्या ठस्यांनी एक नवीन मार्ग शोधत जाऊन प्रगती प्राप्त होते...
"हळुवार पाऊले पडले अचानक या लहान बाळाचे...
याचं पावलाने दृष्टिकोन बदलेल तुझ्याच आयुष्याचे...
चिमुकल्या बाळाची प्रगती त्यास काय माहित असे...
पहिलं पाऊलं पडून उमटतील या बाळाच्या पायाचे ठसे..."

कु. अश्रिता विजय बारसे