*।। फास ।।*

Started by sanjaykanha, January 03, 2017, 05:14:52 PM

Previous topic - Next topic

sanjaykanha

*।। फास ।।*

(शेतकरी कष्टाचे जीवन जगुणही शेवटी हाती मात्र काहीच लागत नाही याचे
वर्णन कवी संजय कान्हव यांनी या फास कवितेत उतरवीले आहे, आवडल्यास
नावासहीत जरूर शेअर करा)

आयुष्यभर तुडवली शेती
आज शेतीनेच तुडवीले हाय ।
*का? लटकतो फास गळ्याला*
*उगीच मस्करी म्हणुनी नाय*।।धृ।।

दिनराती मातीत मुरला ।
पिकांत प्राण ओतून भरला ।।
तरी मोतीयांची शेती
आयुष्यात पाहिलीच नाय ।।१।।

पिकास पाणी घातले घामाने ।
शेतीत रक्त आटविले जोमाने ।।
तरी सुखाने कधी घास
या मुखी गेलाच नाय ।।२।।

थंडी पावसात गोठला ।
उन्हा तान्हात आटला ।।
तरी या जीवाची पर्वा
आजारपणात केलीच नाय ।।३।।

जेव्हा फुलली शेती भारी ।
पावसाने धुवून नेली सारी ।।
रडण्यास डोळ्यांत काही
आसवे उरलेच नाय ।।४।।

कर्जबाजारीने केले बेजार ।
सावकाराने काळजात केले वार ।।
शेवटी लाखमोलाची शेती
विकण्या पर्यायच नाय ।।५।।

कवी संजय कान्हव
मोबा 9850907498
धारगाव नाशिक