विटाळ

Started by sanjay limbaji bansode, January 06, 2017, 11:15:24 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

शंकराच्या जटातून उगमलेली तुझी ती गंगा !
माझ्या वीटाळलेल्या वस्ती पर्यंत पोचलीच  नाही.
आणि आम्ही राहिलो हजारों वर्षे तिच्यावासून.
जन्मतःच तुझे भविष्य लिहणाऱ्या सटवीने
आमच्या दाराचा उंबरठा कधी ओलांडलाच नाही.
आणि आम्ही झालो भविष्यहीन.
ज्याला आजवर सूर्य म्हणून पुजले
ते तर ढुंगनातून टीमटीमणारे काजवे निघाले.
ज्याला आम्ही सळसळणाऱ्या ज्वालामुखीच्या लाव्हा समजत होतो
ते तर मनु नावच्या नाल्यातून वाहणारं सडकं गटाराचं पाणी होतं.
आता बस्स !
माझ्या रक्तातल्या स्वातंत्र्याचा सागर हुसळ्या मारतोय.
बंद कर आता तुझं  रडगाणं.
हा सागर कधी त्सुनामी बनून
तुझी जुलमी सत्ता नेस्तनाबूत करील ते सांगता येत नाही.

संजय बनसोडे 9819444028