ती सध्या काय करते ?

Started by Rupesh Gade, January 08, 2017, 03:02:09 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

ती सध्या काय करते,
आहे का तिच्या लक्षात माझे प्रेम, का दुसऱ्यासाठी झुरते,
ती  सध्या काय करते,
तिच्या प्रत्येक भेटीच्या आठवणीने मन भरते,
ती सध्या काय करते,
प्रत्येक वाऱ्याची झुळूक तिच्या येण्याची चाहूल ठरते, आणि तिची ओढ हृदया भोवती गोल फिरते,
ती सध्या काय करते,
कधी पावसात भिजण्यासाठी माझ्या समोर हट करते, तर कधी अजारी पडेल मी म्हणून छत्री डोक्यावर धरते,
ती सध्या काय करते,
Lecture ला Bunk करून मी मनमुराद फिरायचो आणि कोरा पेपर हि फक्त तुझ्या मुळेच भरायचो, तेव्हा नाही केली तुझ्या प्रेमाची कदर म्हणून माझे हि हृदय तळमळते,
ती सध्या काय करते,
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी बोली होतीस...माझ्या Touch मध्ये रहा, आणि मी पण सहज उत्तर दिले होते..तू फक्त वाट पहा,  आता वाट पाहण्याची किंमत मला ही कळते, ती सध्या काय करते...


                                                 - रुपेश मारुती गाडे