मराठी सण : मकरसंक्रांत

Started by rahudoc, January 15, 2017, 01:22:06 PM

Previous topic - Next topic

rahudoc


हटणार धुकं, सुर्यदेव हा आकाशी
धन राशी मधुन, जाई तो मकर राशी
'सुगी, सबरीमाला' म्हणतात दक्षीणी
'मागी' सजते पंजाबी, 'किचरी' असते काशी

गुलाबी होती जी थंडी, घातक होऊ पाही
ऊब देण्या प्राणिमात्रा, सुर्य नभामधे येई
देई सार्यांना प्रकाश, देई आशेचा किरण
जुन्या कटुता सोडा, गोड व्हावं हे जीवन

तिळगुळाचा प्रसाद ह्या उत्सवा निमित्ती,
आपणासर्वांना इच्छीतो, 'शुभ मकरसंक्रांती'
              -  © डाॅ. राहुल पाथ्रीकर