स्वच्छ भारता साठी माझे योगदान आणि अपेक्षा*

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 15, 2017, 10:51:26 PM

Previous topic - Next topic


*विषय...स्वच्छ भारता साठी माझे योगदान आणि अपेक्षा*


भारत हा माझा देश आहे आपण असं
म्हणतो पण तसं वागत नाही आपण
तेच तर आपलं घर आहे असं समजत
नाही आपण घराला आपल्या जस स्वच्छ ठेवतो तस देशाला स्वच्छ का
ठेऊ शकत नाहीत आपण भारत आपला देश नसून आपलं घरच
आहे असं समजा का नाही होणार आपला भारत स्वच्छ मी असं सांगू इच्छितो या भारत देशातील लोकांना
भारत देश आपलं घरच आहे असं समजून रहा नियमित स्वच्छ ठेवा
कुठं कचरा दिसेल कचरा कुंडीत टाका
असं केल्यानं आपले हात घाण होणार
नाहीत स्वच्छ होतील असे समजा
सार्वजणीक ठिकाणी घाण करणं बंद
करा हिच *अपेक्षा*करतो बस काही नाही

तुम्ही केलेल्या घाणी मूळ आपल्यालाच त्रास होणार आहे हे
लक्षात ठेवा डेंग्यू ,स्वाइन फ्लू ,यांन सारखे आजार हे काय पूर्वी पासून होते का हे आपणच निर्माण केलेले
आहेत याच जरा भान ठेवा आणि
स्वच्छते कडे जरा लक्ष द्या हेच हवं
आहे आपल्या आणि या मुळेच आपण
सुखी जीवन जगू शकतो आणि आजारानं पासून वाचू शकतो

मी तर असं ठरवलं आहे की प्लास्टिक
पिशवी ,सांडपाणी ,कचरा ,
यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने झाली
पाहिजे या दृष्टी कोणातुन मी पाऊल
उचलले आहेत तुम्ही पण तुमच्या गाव
पातळी वर उपाय योजना करा आज
मी पाहत आहे की वृक्षतोड हि मोठया
प्रमाणात केली जाते या मुळे पावसाचे
प्रमाण कमी होते त्यामुळे मी नेहमी
माझ्या वाढदिवसाला 10 रोपी लावायची ठरवली आहेत आणि मित्रांना सुद्धा सांगितलं आहे मी
टाकाऊ कचरा आपण कोठेही टाकतो
आणि तोच कचरा आपल्याला प्राण घातक ठरत आहे
तोच कचरा जनावरांच्या पोटात जातो
गाई ना आज काल चरायला सुद्धा कुरण
कोठे शहरात राहिली आहेत शहरातील जनावरे आज काल रस्त्या वरच भटकताना दिसतात तिचं जनावरे रस्त्यावरील कचरा खातात आणि त्याच जनावरांचं दूध आपल्या पोटात जात त्यामुळं आपण सुद्धा आजारी पडतो आणि भरपूर गाई वासरे पण दगावल्याली आहेत आणि ते अजून बंद झालेलं नाहीये
आणि हे सर्व बंद करण्याचा मी प्रयत्न
करेल या सर्व गोष्टी माझ्या एकट्या कडून पूर्ण होणार नाहीत पण तुम्ही मी आपण सर्वांनी मिळून जर विचार केला तर आपण बऱ्या पैकी होणारे
प्रदूषण या वर नियंत्रण ठेऊ शकतो

म्हणून मी सर्वाना बोलू इच्छितो

मी एक पाऊल स्वच्छतेसाठी उचलत
आहे तुम्ही अजून पाच जणांना तयार
करा स्वच्छतेेसाठी।   

✍🏻....(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर
****************************