आठ्वणीतलं प्रेम

Started by GaneshKayande, January 19, 2017, 04:24:36 PM

Previous topic - Next topic

GaneshKayande

 आज ऑफिस ची जुनी file शोधताना एक बुक सापडलं।स्लॅम बुक , तिने दिलेले। बायको पासून चोरून ठेवलेलं,जुन्या आठवणींनी धूळ खात पडलेलं ।
    ते मी कधी पून्हा वाचणार नाही असं ठरवलं होतं पण मन पुन्हा तिच्या आठवणीत रमायला करत होत । मग काय ऑफिस ची file सापडणं तिथंच सोडून दिलं। स्लॅम बुक घेऊन वरती गच्ची वर गेलो , दरवाजा लावून घेतला आणि बसलो भिंतीला पाठ लावून। स्लॅम बुक वरून एकदा हात फिरवला , मनातल्या आठवणी वरची धूळ पुसून टाकली । पहिलं पान उघडलं तर त्यात तिने दिलेलं गुलाबाचा फुल सापडलं । माझ्या प्रेमा प्रमाणे बिचारं तेही सुकुंन गेलं होतं । तरी पण त्यातून प्रेमाचा सुगंध येत होता , ओल्या मातीचा सुगंध जसा मन ओढून नेता तसा नेत होता। ते दिवसच वेगळे होते । कशाची भीती नव्हती , कशाची फिकीर नवंती । फक्त प्रेम करायचं। काही पान वाचल्या नंतर मला तिने माझ्या साठी केलेली कविता दिसली । माझ्या साठी कोणीतरी केलेली पहिली कविता। छोटीशी होती पण माझ्या साठी पूर्ण जग त्यात सामावल होत ।मी तिला माझ्या प्रेमा बद्दल कधीच सांगितलं नव्हतं। पण तीन ते समजून घेतलं होतं।
तिने माझ्या बद्दल खूप काही लिहिलं होत। आम्ही सोबत घालवलेल्या प्रत्येल क्षणाचा त्यात उल्लेख होता । तिला ते आजही आठवत असेल का । ती आजही माझ्या वर प्रेम करत असेल का। अशा अनेक प्रश्नांनी मन भारावून गेल । तिने लिहिलं होतं की मला खूप उत्तम जीवनसाथी मिळेल । खरं होत तिचं । पण वाटत कधी कधी एवढ प्रेम करून सुद्धा तिला मिळवू शकलो नाही। पण मला याचा खेद नाही । तिला आजही मन मोठया हक्काने आठवते। पण आठवणीत भावनांचा उद्रेक झाला की मन स्वतः लाच संपवायला लागत। का कोणावर एवढ प्रेम करतो म्हणायला लागत। शेवटी मन हेच म्हणत कि तुला नाही मिळवता आलं जे पाहिजे ते। का कोणावर एवढ प्रेम केलं ।काही गरज नसताना का कोणावर सर्व जग लुटवल । माहित होत नाही मिळणार ती , मग का तिच्या साठी सर्व भावनांना जपलं ।
               ~गणेश कायंदे