कविता II प्रेमाचा डाव बघता बघता उधळला II

Started by siddheshwar vilas patankar, January 19, 2017, 07:33:45 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



ती आली होती फक्त एकदा घरी

एक वाटी दूध मागायला

मला वाटले तिला दूध आवडते

म्हणून गेलो म्हशी पाळायला

खरी पंचाईत तेव्हा झाली

जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय

दुध देतच नाही

म्हशींसोबत रेडा बघितला

बाप माझ्यावर जाम भडकला

शिव्या देउनी खूप बुकलला

व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते

सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते

इकडे झाला उलट गेम

रेड्याने धरला म्हशीवर नेम

रेडा असा काही चौखूर धावला

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

बाप माझा कुत्र्यागत पिसाळला

सुरु झालं मग घरी महाभारत

कसलं दूध अन कसलं प्रेम

सरळ गेलो माघारी

अन म्हशी दिल्या परत


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

:D :D ;) ;) ;) :D :D
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

Thank You Very Much My Dear Friend and Gentle Apology for Delayed Reply

Regards

Patankar
सिद्धेश्वर विलास पाटणकर C