म्हातारी माय ...

Started by Kumar Sanjay, January 20, 2017, 07:24:03 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

संध्याकाळी घराच्या उंबरठ्यात
एकटी बसलेली म्हातारी माय
लेकरांच्या घनव्याकुळ अाशेने
रस्त्याकडे भिर -भिर पाय

डोळ्यांतील आसवे गोठली
लागली दु:ख शिळेची ठेच
थरथरल्या कापत्या अोंठाने
तुक्याचे रोज रोज भजन गाय

खंगुन गेलेली देहकाया
शोक दशरथाचा पूर्ण केला
बोले येवू दे! अखेरचे मरण
झुरण्यात एंकाकी अर्थ काय?


कुमार संजय

7709826774