लायकी...

Started by गणेश म. तायडे, January 21, 2017, 09:03:47 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

लायकी काय आहे माझी
मला कधी नव्हती कळली
प्रेम करण्याचा नाही हक्क
गोष्ट जरा उशिरा वळली

प्रेम केले फुलापरी अन्
आघात दगडांनी केला
दुरावत आहोत आम्ही
त्यांनी पेच असा टाकला

माझ्यात ती, तिच्यात मी
एकमेकांत जीव अडकला
ओढताण ते करू लागले
आसवांचा सडा शिंपला

नाही मी खोटा ना लबाड
जीव जाईल तुझ्याविना ग
नको काही तुमचे धनधान्य
मला हवा बस्स साथ तुझा ग

कळून चुकले आता मलाही
मी तुझ्या लायकीचा नाही
तू चंद्र जरी आहेस माझा पण
अमावस्येत तुझे उगवणे नाही

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11