प्रेमाच रोपट

Started by GaneshKayande, January 21, 2017, 11:19:53 PM

Previous topic - Next topic

GaneshKayande

छोटस रोपट जमिनीतून बाहेर यायला लागते ,
जणू सकाळ झाली की सूर्य उगवला अस वाटते।
हळु हळु ते रोपट मोठ व्हायला लगते
नकळत उन , वारा , पाऊस यांच्या सोबत खेळायला लागते।
उन, वारा ,पाऊस  सतत त्याला त्रास देत असतो
पन मोठ्या मनाने तो त्यांना कुशित समावुन घेत असतो।
या सर्व गोस्टिनशी झुंजायला त्याच्या कड़े निवारा नसतो
पण मोठ मन , सहनशक्ति हाच त्याचा सहारा असतो।
झाल मोठ रोपट की त्याला फळे , फूले , पाने येऊ लागतात
जे भूकेल्या वन्य प्रन्यांची भूक भागवतात।
तो कोनाकड़ूंन काहीच अपेक्षा करत नाही।
केलेल्या उपकारांची परतफेड मागत नाही।
तो एका जागेवरुन दुसरीकडे कधीच जात नाही
माणसांच्या मना प्रमाणे तो बदलत रहात नाही।
मरे पर्यंत तो काही न काही देत च असतो ,
आपन फक्त घेतच असतो , वरुण अपेक्षा करतच असतो।
झाल ते म्हातार की त्याची पान गळायला लागते
जणू आयुष्य त्याची साथ सोडायला लागते।
तेव्हाही ते उन वाऱ्याशी खेळतच असते,
आयुष्य ज़ालय मित्रा आता तुज़्या सोबत खेलता येणार नाही हे त्यांना सांगत असते।
आयुष्य संपल्यावर ही तो खुप काही देऊन जातो
गरीबांच्या दोन वेळच्या जेवनासाठी आपली लाकड़े सोडून जातो।
संपूर्ण आयुष्य तो दुसऱ्यांसाठी झटत राहतो
कळत नकळत आपल्या भावना मागे टाकून देतो।
कधीतरी वाटले वृक्षाच्या भावना समजून घ्याव
आयुष्यात एकदा तरी त्याच्या प्रमाणे जगून पहाव। पन त्याच्या सारख्या भावना मानवाच्या होउच्च सकत नाही
कारण वेळ पडली तर आपन आई वाडिलांचा ही विचार करत नाही।
महान आहे ते वृक्ष समजून पहाव एकदा तरी त्याच्या मनाला
मानवा प्रमाणे त्याला ही असतात त्याच्या भावना।
                            ~माधुरी कोंडे