आमचं काय चुकलं ? (उपरोधिक कविता)

Started by Asu@16, January 23, 2017, 10:57:17 AM

Previous topic - Next topic

Asu@16

आमचं काय चुकलं ? (उपरोधिक कविता)

आमचं काय चुकलं ?
हो, तुमचंच चुकलं !
       मांजराचा नाही घेतला
       कुत्र्याचा नाही घेतला
       मुलीचा जन्म घेतला !
       पुण्याचा नाही साठा केला
       तिथंच तुम्ही चुकला
       आणि वरून विचारता,
आमचं काय चुकलं ?
हो, तुमचंच चुकलं !
       स्कर्ट, शाॅर्ट घालता
       पार्ट्या बिरट्या करता
       रात्रीबेरात्री येता
       भल्या पुरूषां चाळवता
       गरीब बिचाऱ्यां भुलविता
       पापकारिणी आणि विचारता
आमचं काय चुकलं ?
हो, तुमचंच चुकलं !
       रेप होतात स्कर्टवर
       आणि होतात बुरख्यावर
       होतात रेप बाळांवर
       आणि होतात आज्यांवर
       तुमचा जन्म भोगासाठी
       पुरुषांचं काय चुकलं !
आमचं काय चुकलं ?
हो, तुमचंच चुकलं !
       काका मामा भाऊ मित्र
       साऱ्यांचे एकच चित्र
       जपा स्वतःला दिनरात
       कधीही करतील घात
       मुलगी झाली केला गुन्हा
       म्हणू नका पुन्हा पुन्हा
आमचं काय चुकलं ?
हो, तुमचंच चुकलं !

- अरूण सु.पाटील 

https://www.facebook.com/AsuChyaKavita