राजाची दिवाळी

Started by Asu@16, January 23, 2017, 11:02:02 AM

Previous topic - Next topic

Asu@16

राजाची दिवाळी

आटपाट नगरात
एक माणूस झाला राजा
झाला सगळा गाजा वाजा
खूष झाली प्रजा
नेहमीसारखी रडतखडत
आली दिवाळी घरात
राजा आला कैफात
केली फतव्यांची खैरात
म्हणाला, साखर खायला वाईट
करा साखरबंदी टाईट
दिवाळीत गूळ जवळ करा
साखर निक्षून दूर सारा
रेशन दुकानी जमा करा
कार्डावर साखर एक्सचेन्ज करा
शंभर ग्रॅम आठवड्याला
दिवाळी खुशाल साजरी करा
साखर कारखाने मोडीत काढू
गुऱ्हाळांचे अनुदान वाढू
साखर वितळून गूळ घेऊ
नंतर तुम्हा भरपूर देऊ
आता थोडी कळ सोसा
नका बनू भित्रा ससा
कुत्र्यासारखे भुंकू नका
निर्णय आमचा शंकू नका
प्रजेला उरला कुणी ना वाली
अशी दिवाळी साजरी झाली
प्रधानजीही माणूस भला
त्याने एक नियम केला
लक्ष्मीपूजनाचा सेल्फी काढा
शाळेत जवळच्या लगेच धाडा
अल्पसंख्य बिचारे हिरमुसले
तक्रार घेऊन दरबारी गेले
पाहून संख्या, बळ त्यांचे
राजाने नियम शिथिल केले
बहुजनही मग गोळा झाले
सिंहासन हलवू लागले
राजा मग जागा झाला
प्रधानाचा निषेध केला
नियम त्याचा बरखास्त केला
आनंदाची पहाट झाली
अशी दिवाळी साजरी झाली
फतवे सारे हटवे झाले
मंत्री बिचारे घाबरुन गेले
एकी करून दरबारी गेले
राजावरती खरंच रूसले
राजा हळूच गाली हसला
गोष्ट सांगतो तुम्हा म्हणाला
चारदा पडून परत उठला
प्रयत्न त्याचा कधी न चुकला
कोळ्याने शेवटी जाळे विणले
अपयश त्याने नाही गणले
नंतर त्याची चांदी झाली
सावजं चालत जाळ्यात आली
अशी दिवाळी साजरी झाली

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita