==* वाट संपल्यावर ...? *==

Started by SHASHIKANT SHANDILE, January 23, 2017, 12:56:00 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

उन्हा तान्हातणं फिरली ती
घेऊन लेकराला खांद्यावर
पैका पैका भीक मागली
का गरिबी हि माथ्यावर

नवरा व्यसनी म्हणून बेकामी
जबाबदारी त्या बिचारीवर
मुलं केली पैदा नवऱ्याने
प्रेम फक्त घोडं उठल्यावर

नारी म्हणून पाडला पत्नीधर्म
सासू सासरे उठे मरणावर
माय बापाने तरी काय पाहिलं
दिली अशी सोडून वाऱ्यावर

ती तर होती स्वप्नातच जगणारी
तुटले स्वप्न वास्तव जाणल्यावर
जग खूप हरामी निर्लज्ज नीच
जिंकत आली बुऱ्या नियतीवर

वाकली नसती ती कधी कुठे
प्रश्न उभा उपाशी मुलांवर
थकली शेवटी अब्रू विकली
काय करणार वाट संपल्यावर

करणार तरी काय बिचारी ती
वाट संपल्यावर ?????
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!