छोटी गोष्ट...

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 29, 2017, 07:40:26 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

एक मुलगा आणि मुलगी खूप चांगले मित्र  असतात. तो तिच्यावर खूप प्रेम करत असतो आणि तिला हे माहीत असत.
त्यांचं नात हे प्रेम, मैत्री या पेक्षाही वरच असत. तो तिच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हता. तो तिच्यात पूर्ण गुंतलाय हे तिला समजलं होत.त्याला कसलाही त्रास झाला तर तिला जराही सहन होत नव्हतं.
त्यांनी तिला खूप वेळा सांगितलं त्याच्या प्रेमाबद्दल पण ती प्रत्येक वेळेला हसायची मग तोही हसायचा, त्याच तिच्यावर मनापासून प्रेम आहे हे जाणून सुद्धा ती हसायची कारण तिला तिच्या आयुष्यात काय ठेवलय हे माहीत होत.
एकदा ती त्याला अट घालते की जर तू पूर्ण एक महिना माझ्याशी नबोलता राहिला तर आपण एकत्र येऊ. अट खूप अवघड असते कारण तो राहू नाही शकणार हे माहीत होत त्याला तो तिची अट मान्य करतो. ती त्याला एक डायरी देते आणि बोलते जेव्हा अट पूर्ण करशील एकदा ही डायरी जरूर वाच, आणि निघून जाते. तो ती डायरी घेऊन जातो महिना कसाबसा तिच्याशिवाय घालवतो. महिना पूर्ण होताच तो तिला कॉल करतो, त्याला तिला सांगायच अस्त "मी केल" पण ती फोन उचलत नाही, तिला कसलाच संपर्क करता येत नाही तो कासाविस होतो. मग त्याला डायरी बद्दल आठवत,तो गडबडीने डायरी वाचतो. त्याचात तो तिला आयुष्यात आल्यापासून तिला त्याचा बद्दल जेजे वाटलं ते तिने लिहिलं होत. ते वाचून तो खूप आनंदी झाला, पण डायरीच्या शेवटी तिने एक पत्र लिहिलं होत" तू अट पूर्ण केलीस पण आता हे रोज कर कारण माझ लग्न झालं आहे. मी तुला सामोरी जाऊ शकत नव्हते म्हणून ही अट घातली मला माफ कर. पण माझ्या आयुष्यातली  तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. त्याला अश्रु अनावर झाले आणि जमिनीवर कोसळला.  ...
- बुद्धभूषण गंगावणे.
  7738628059