वारा

Started by Dnyaneshwar Musale, February 02, 2017, 09:46:38 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

सळसळणारा वारा हल्ली
खुप मनाला भिजवतो
मनात तु रुतली आहे
एकटेपणात  गाजवतो.

संध्याकाळी चौपाटीवर  जवळ
येऊन दर्शन तुझं घडवतो
तोच वारा रात्री  गॅलरी वरती
एकट्यालाच रडवतो

मनसोक्त दारूचा गोठ
घेताना तुझा चेहरा दारूलाच फसवतो
नशा नसतानाही तोच वारा
एकट्यालाच हसवतो.

तुझ्या सारखंच वाऱ्यासोबत
उठुन दिसतात चंद्राच्या कोरा
तु नसली तरी तुझ्या मनातलं
बरच काही सांगुन जातो
सळसळणारा वारा.

प्रश्न पडतो तुला कधी
हा अडवतो का वारा
तु बोलणार तेच उत्तरत
निखळतो एक तारा.

तरी तुझं माझं नातं
काहीतरी आहे वाऱ्याशी
एकदा प्रेम करून बघ
वाऱ्या सोबत तुझ्या सभोवताली
घुटमळणाऱ्या माझ्या  हृदयाशी.