दवा रोज उरते

Started by dwait, February 03, 2017, 04:31:15 PM

Previous topic - Next topic

dwait

आता दारुखाण्यात दवा रोज उरते
जरा घोट घेता तुझे नाव स्मरते
आता आसवानिंच मी भरतो हे प्याले
अताशा सयांचिच नशा फार होते

उन्हे कोवळी ती आता रुक्ष झाली
फुले लाजरी ती कशी दुष्ट झाली
कसे ओस पडले हे सारे नजारे
उगा सागराने बदलले किनारे
आता ही उदासी मला धुंद करते
इथे खोल ती आग अजून मंद जळते
अशी मग भडकते जरा घोट घेता
कधी आगीला का दवा ही विझवते

आता दारुखाण्यात दवा रोज उरते
जरा घोट घेता तुझे नाव स्मरते


कवी - द्वैत