तुझ्याविना नसतो पर्याय

Started by dalvisuraj, February 04, 2017, 03:29:07 PM

Previous topic - Next topic

dalvisuraj

नव्याने ऊगावं सूर्याने तसा
मी ही जगत होतो नव्या प्रतिभेनं.
धसकटलेल्या जगण्याला झुगारून
पर्यायच शोधत होतो अखंड.
आणि त्यात तुझा सूर्योदय झाला..!

तर रात्र तीच दिवसही तोच
आकाश ही रोजचंच.
मला सापडत नाही
पर्याय आता कसलाच तुझ्याशिवाय.
अंधा-या रात्रीच फोफावते दुपार
सुकलेल्या माझ्या डोळयात...!

म्हणून भुललो तुझ्या प्रेमाला.
डुबलो तुझ्या डोळयात.
विसावलो तुझ्या सावलीत क्षणभर तर...
तर संशयीत तुझ्या डोळयांनी
नजर मिळवलीच नाही.
न राहून विचारलं तुला ही
तर तू ही म्हणाली
मला तुझ्या चेह-यात मी दिसत नाही..!

तसाच या जीवघेण्या स्पर्धेत
धावत सुटलो मी.
पुन्हा शोधू लागलो
माझाच विस्कटलेला मलूल चेहरा.
बघु लागलो माझंच परावर्तित प्रतिबिंब
एका निळयाशार थबकलेल्या डोहात.
तर लाटा ही बेइमान झाल्या
डोहासोबत परागंदा होऊन.
या विवश हताश चेह-याला
न दाखवताच उसळत गेल्या..!

झालोय आता अबोल मी.
काय करू काय नाही.
माझ्या जगण्याचं गूढ
तुझ्यासाठी देऊन जाईल.
पुन्हा एक अनुत्तरित प्रश्नाला जन्म.
सुगंधीत गुलाबाला ही
काट्याचा शाप असतोच.
तुला माहित नसेल कदाचित.
घेऊन जा तू दिलेला सुसह्य एकांत.
नाईतर निरपराध जन्माचा करून जाईल,
निर्घृण करून अंत..!

- सुरज