निवडणूक आली वाटतं....

Started by Rajesh khakre, February 06, 2017, 03:09:42 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

निवडणूक आली वाटतं

लगबग सुरु झाली
गाडी गावाकडे फिरली
खादी अंगावर चढली
निवडणूक आली वाटतं

नेत्याची धावपळ वाढली
कार्यकर्त्यांची गर्दी झाली
मतदारांची पर्वा वाढली
निवडणूक आली वाटतं

विकासाची चर्चा झाली
समस्यांची यादी झाली
आश्वासने वाटली गेली
निवडणूक आली वाटतं

घरोघरी भेटी वाढल्या
पायावरती माना पडल्या
पारांवरती गप्पा रंगल्या
निवडणूक आली वाटतं

हॉटेलं बुक झाली
भुकेची सोय झाली
बाटली रिकामी झाली
निवडणूक आली वाटतं

पाच वर्षांची ही दिवाळी
गरीब-हिताची आरोळी
नेता लोटांगण घेई
निवडणूक आली वाटतं
©  राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com