कॉफी आणि बरेच काही.

Started by Vishakha Sonawane, February 07, 2017, 02:30:00 PM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

आज पहिल्यांदा सोबत कॉफी पीहायला गेलो ,
फेसाळलेली ती कॉफी आणि गारवा ,यात बेधुंद झालो ,

थंडीचे दिवस , पानावर दव बिंदूंनी थांग मांडले होते ,
जणू हिरव्या शालीवर मोत्यांनी गुंफण घातले होते .

आयुष्यावर काही साधारण गप्पा चालू होत्या,
प्रत्येक घोटात  आमच्या गप्पा रंगत होत्या .

गपांमध्ये एवढे गुंतलो कि आजूबाजूचा विसर पडला ,
पण मला बऱ्याच दिवसापासून मनाचे गुपित सांगायचे होते त्याला .

त्याचे बोलणे काही केल्या थांबत नव्हते .
आणि सुरवात कशी करावी ते मला सुचत नव्हते ,

मी बोलणार इतक्यात हळुवार वाऱ्याची झुळूक आली ,
जणू काही ती झुळूक माझ्या मनातले बोलत होती पण त्याला ती समजत नव्हती .

त्याच्या कॉफी चा कप रिकामा झाला ,कळलेच नाही त्याला,
आणि त्या कपमध्ये ,मी शोधात होते ,आमचा सोबतीचा गंध निराळा .

त्याने अचानक मला स्वप्नातून जाग केले ,
मैत्रीचा हात पुढे करून ,पुन्हा भेटू म्हणत ,
पुन्हा कॉफी साठी आमंत्रित केले .. .....



                                                विशाखा सोनावणे