तुझीच वाट मी पाहते......

Started by ssr3091, January 16, 2010, 06:14:30 AM

Previous topic - Next topic

ssr3091

तुझीच वाट मी पाहते......

उदास-उदास ही रात्र का रे  ??
निर्जीव हा आसमंत का ?
काळोख आज ही वाट आहे...
शांतता ही अबोल का  ??

दिसते न मज आता चंद्र-तारे,
न जाणे कोण आस ही लागली ?
ऐकू येई प्रत्येक आवाज जरी,
स्वतःमध्ये मी एकली...

मोकळेपणाचे हे कसले वादळ
आज मनामध्ये दाटले ?
काय शोधते ही नजर ?
न जाणे कोण खोलवर रुतलेले...

तू जरी का आज नाहीस...
का तुझी हक मज भासते ?
का कोण जाणे अजूनही
       मी तुझीच वाट पाहते....
           मी तुझीच वाट पाहते....
[/i][/i]