वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे

Started by mkamat007, January 16, 2010, 07:42:36 PM

Previous topic - Next topic

mkamat007

 :( :(
आयुष्य भर प्रेमाने सोबतीला राहावे
सारे काही ज्याच्या बरोबर मी बोलावे
हृदयाची सारी गुपीते खोलावी
वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे
धुंद पावसात मला बिल्गुन राहावे
बेधुन्द जेव्हा होईल मी त्या मिठीत
त्यानेच हळूच मला सावरावे
वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे
आयुष्याला माझ्या नवे वळण द्यावे
बोलता येणारे आणि नबोलता येणारे सारे
हासत हसत त्याने समजून घ्यावे
वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे
गुणगुणलेले बोल ही तिने गीत समजावे
तीचे प्रत्येक गीत हृदयात माझ्या साठावे
वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे
आयुष्याचे गणीतच त्याने बदलून टाकावे
सुखाला शेकडोनि गुणून दुखाला भागावे
वाटते मला पण कोणीतरी माझे व्हावे
जीव माझा त्याने फुलासारखा जपावा
संरक्ष्यानासाठी माझ्या तो काटा ही बनावा
पाहिलेले हे स्वप्न खरच पूर्ण व्हावे
वाटते मला पण कोणीतरी माझे
unknown

santoshi.world