खरंच किती दांभिक असतो ना आपण...

Started by Rajesh khakre, February 14, 2017, 09:34:12 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

खरंच किती दांभिक असतो ना आपण...

इलेक्शनात उभे असलेल्या उमेदवाराने दिलेल्या दोन हजाराच्या दोन नोटा त्याने हळूच बायकोकडे सरकवल्या आणि चहाचा झुरका घेऊन तो ओट्यावर गप्पात रंगलेल्या घोळक्यात सामील झाला...
चालू असलेल्या विषयाला हात घालत तो म्हणाला, "कुणालापण निवडून द्या, तो काही विकास नाही करत....आपल्या समस्या आजही त्याच आहेत ज्या 50 वर्षांपूर्वी होत्या..सर्व एकाच माळेचे मणी"

किती दांभिक असतो ना आपण...

दोन वर्षांपासून तो काम करत असलेल्या पक्षातून त्याला उमेदवारी नाही मिळाली म्हणून त्याला ज्या पक्षाने उमेदवारी देऊ केली त्या तिकिटावर आहे तो उभा, काल त्याच्या गळ्यात वेगळ्याच कलरचे उपरणे होते, आजच्या उपरण्याचा कलर वेगळा आहे, त्याची भाषा मात्र नाही बदलली अजून, त्याला अजूनही विकासच करायचा आहे, असे तो म्हणतो, अगदी सकाळी सकाळी प्रचारासाठी तो हजर असतो गावात.त्याचा एकच ध्यास आहे म्हणे...तिथल्या भागाचा विकास...

किती दांभिक असतो ना आपण...

आमच्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आम्ही मुकाट बघत असतो, कधी त्याचा एक हिस्सा ही बनतो, त्या सहन ही करत असतो, फक्त त्याच्यावर बोलायचे नाही, उगीच कशाला, आपल्याला काय करायचे नुसत्या वादात पडून म्हणून सोडून देतो, वरवर मात्र आम्ही अतिशय सभ्य असतो..!

खरंच किती दांभिक असतो ना आपण...
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com