एक इच्छा माझी पूर्ण कर.

Started by Siddhesh Baji, January 16, 2010, 08:22:23 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

खर सांगू देवा,
एक इच्छा माझी  पूर्ण कर.
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर.
कारण आज-काल लग्नाच्या बाजारात,
पोरीच्या गुणापेक्षा,
आई-बापाच्या  पैश्याला जास्त महत्व आहे.
कितीही काही झाले तरी पोरगी मात्र तोला-मोलाच्या घरातली हवी,
हे प्रत्येक वर पित्याचे तत्व आहे.
मग तूच सांग बर देवा आता,
गरीबाच्या पोरींचं काय बर होणार?
आमची पण काही स्वप्न आहे कशी बर ती पूर्ण होणार?
काय गुन्हा देवा माझा गरीबाच्या घरी जन्माला आले.
आई-बापाचे कष्ट वाटून घेतले,
घरासाठी राब राब राबले.
लोकाची काम करून शिक्षण माझे  पूर्ण केले.
गरीबीचे टाके शिवता शिवता,
चार चौघीनसारखे स्वताला बनवले.
स्वताच्या पायावर स्वत उभी राहिले.
पण तरी सुद्धा घर आणि नोकरी दोनीहि नीट सांभाळत राहिले.
आई बापाच्या संस्काराला पुन्हा पुन्हा जपत राहिले.
संस्कृतीच्या वरस्याला पुन्हा पुन्हा जोपासत राहिले.
पण तरी सुद्धा ह्या लोकांना मी तोला-मोलाची कधी वाटलीच नाही.
कारण श्रीमंत आई बापाच्या पोटी मी जन्मलीच नाही.
म्हणून सांगते देवा आता तरी मागण माझ  पूर्ण  कर,
ह्या  जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर.

Author-Unknown

santoshi.world

vachlyasarakhi vatatey hi kavita already mk var .......