तू एकदा उमलून जा....

Started by dhundravi, January 17, 2010, 12:05:19 AM

Previous topic - Next topic

dhundravi

केसातल्या ओल्या धुक्याचे
   ............ रान तू ऊठवून जा...
भडकू दे श्वासात वणवा....
   ............ तू एकदा उमलून जा....


जवळ तू... तू दूर तरीही
बघ चिडवतो हा गार वारा
सुचवतो पाऊस काही
   ............... तू ज़रा उमजुन जा...


थांबायचे नसते तुला तर
भेटायला येतेस का ?
आता जवळ घेस्वप्नात मजला
किंवा
   ...................... झोप तू ऊडवुन जा....


चिंब डोळ्यांच्या किनारी
राहिलो मी कोरडा
आता बुडव तू मद्यात मजला
किंवा...
   .....................पापण्या उघडून जा....


बेईमान सारे शब्द माझे
गुंतले तुझ्या कवितेमध्ये
ओढ़ मलाही कवितेत... किंवा
   .................... पान हे ऊलटुन जा


चंद्रास माझ्या विरहपीडा
पौर्णिमेच्या धुंद राती
झटक तू ... केस आता तुझे अन...
   ..................चांदणे उधळुन जा ...



घाव झेलायास मागे
मी आता उरलो कुठे ?
काही तुला देण्यास नाही
   ............ जे राहिले ... उचलून जा....


धुंद रवी



Prachi


indradhanu


santoshi.world