"रौद्र"

Started by dhundravi, January 17, 2010, 12:10:08 AM

Previous topic - Next topic

dhundravi



उतरती संध्याकाळ
वातावरण ढगाळ
एक चिमुकला बाळ
      ........खेळे अंगणात

वारा सुटला जोरात
आई बोलावे घरात
पाणी साठले ढगात
      ........होणार बरसात

उठले वीजेचे तरंग
सारे पावसाचे रंग
बाळ खेळण्यात दंग
      .......आपल्या नादात

आली वीजेला लहर
केला उगीच कहर
कडाडली बाळावर
      ........बाळाचा थरकाप

आईच्या कुशीत घुसून
बाळ रडे हमसून
वीज कडाडे हसून
      ........माज भलताच

आई पसरे पदर
बाई थांबव कहर
कर मायेची कदर
      ........ बाळ पदरात

वीज माजाच्या भरात
म्हणे उन्मत्त स्वरात
घेशी बाळा पदरात
      ........ तू काय कामाची ?

माझ्या येइल मनात
तुझ्या शिरेन घरात
राख होइल क्षणात
      .........तुझ्या बाळाची

वीज बोलता अभद्र
जागे मायेताला रौद्र
पेटे वणवा सर्वत्र
      ........मायेचा हा राग

थरथरले आकाश
हदरले अवकाश
तिच्या डोळ्यात विनाश
      ...........नजरेत आग

जळाले सारे मेघ
पड़े धरणीला भेग
वीजेची कोसळली रेघ
      .........झाली राख राख !

धुंद रवी


santoshi.world


gaurig

वीज बोलता अभद्र
जागे मायेताला रौद्र
पेटे वणवा सर्वत्र
      ........मायेचा हा राग

थरथरले आकाश
हदरले अवकाश
तिच्या डोळ्यात विनाश
      ...........नजरेत आग

जळाले सारे मेघ
पड़े धरणीला भेग
वीजेची कोसळली रेघ
      .........झाली राख राख !
Khupach chan....

ratish

yala mhanatat khari kavita
ekach shabd ahe APRATIM

amoul

sollid kavita aahe yar!! mastach!!!