मला वाटत " वाचा आणि विचार करा"

Started by siddheshwar vilas patankar, February 17, 2017, 09:11:38 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


नमस्कार मी आपल्याप्रमाणेच एक सामान्य नागरिक आहे . नाव "सिद्धेश्वर विलास पाटणकर" . सध्या मीडियावर ज्या पण बातम्या झळकत आहेत त्या आपणा सर्वास योग्य वाटतात का ? मला विचाराल तर "नाही ".
मी सहसा टाळतो जे नकारात्मक दाखवतात ते , पण परवा मी न्यूज वर एक व्हिडीओ पाहिला " मनोज म्हात्रे यांची हत्या " . निव्वळ अमानुषपणा , आणि न्यूज चॅनलवाले तो वारंवार दाखवत होते .
हे सर्व काय चाललंय  आणि का चाललंय आणि सर्व मीडियावर ठळकपणे का ? कुणी लोकांच्या मानसिकतेचा विचार केलाय का कधी ? हे सर्व रोज रोज पाहून एखादा सज्जन माणूस पण हातात शास्त्र घेतल्याशिवाय राहणार नाही .
वृत्तपत्र स्वातंत्र्य मान्य आम्हाला , पण चोर/खुनी /अपराधी पकडला जाण्याआधीच त्याची एवढी दहशत , मी तर म्हणेन जाहिरातबाजी केली जाते कि तो सजा भोगून आला कि लगेच त्याचा हप्ता चालू होतो .
कुठेही अपघात झाला तर त्या अपघात ग्रस्ताला मदत करण्यापेक्षा काही लोक त्याचे रेकॉर्डिंग करून ते मीडियावर टाकणे पसंत करतात .
मेलेल्या लोकांचे विचित्र फोटो सदैव मनावर परिणाम करायला मीडियावर हजर असतात. कधीपण टाकून बघा तुम्हाला खात्री करायची असेल तर .
सरकारने या सर्व नकारात्मक गोष्टीवर त्वरित बंदी आणायला हवी . अहो आत्तापासूनच बालमनावर जर व्यवस्थित संस्कार झाले तर आणि तरच भवितव्य उज्ज्वल आहे .
हे सर्व नाही केले , बंदी जर आणली नाही तर आपल्या देशातील जवानांना स्वतः देशातील नागरिकांशी लढायला लागेल . पोलिसांचा फौजफाटाही कमी पडेल मग ...
वाचा आणि विचार करा . सरकार पाऊल उचलेल तेव्हा उचलेल , पण आपण पण हे नकारात्मक संदेश जागवणारे व्हिडीओ डिलीट करू शकतो किंवा त्यावर तिखट प्रतिक्रिया देऊन मीडियावर दबाव आणू शकतो ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C