मतदान

Started by abhishek panchal, February 20, 2017, 02:43:05 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

         निवडणुका , लोकशाहीचा सण आणि मतदान लोकशाहीतल्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार  . आजपर्यंत याचे सणपण टिकून आहे किंवा आणखी वाढत आहे . मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा , उमेदवाऱ्यांच्या प्रचार फेऱ्या सारंकाही आहे तसंच आहे . फक्त ह्यातला खरेपणा कुठेतरी हरवलाय . निवडणुकांच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस आणि नंतरच्या पाच वर्षात कामांचा दुष्काळ . हे चित्र लवकरच बदलेल अशी उगाचंच वेडी आशा आहे . कुणा एका कार्यक्रमाला हजर राहणे , पाचव्यावर्षात रस्त्यांवर पुन्हा एकदा डांबराचा , काँक्रीटचा वा पेवर ब्लॉक चा थर लावणे , म्हणजे आपल्या दृष्टी कामं करणे असेल तर करतात आपले नगरसेवक खूप कामं आणि हे असेच नगरसेवक आपल्याला आदर्श नगरसेवक वाटत असतील , तर हे चित्र बदलेल अशी आशाच फोल आहे . मुळात विकास काय असतो हेच आपल्याला माहित नाही . नगरसेवक नेमकं करतो काय , हा विचार तर कोसो दूर आहे . जनतेला पायाभूत सुविधा पुरवताना या नगरसेवकांची दमछाक होते , मग सांस्कृतिक कार्यक्रमांना कामांची पावती लावून हे पुन्हा निवडून येतात . कामाच्या जोरावर निवडून येणारे शोधण्यासाठी एखादी गाळणीच असावी . त्या गाळणीतून बाहेर पडणारे फार दुर्मिळ जीव म्हणावे लागतील आणि गाळणीत अडकणारे आपापल्या वार्डातले नगरसेवक . जे कामाच्या जोरावर निवडून येतंच नाहीत .

       आपली मानसिकता फारच बिघडली आहे . अमुक माझ्या ओळखीचा आहे , म्हणून त्याला मतदान करतो . मग त्याची पात्रता , त्याचे काम काहीच विचारात घेतले जात नाही . मग हेच ओळखीतले तुमच्या कार्यक्रमांना हजर राहून तुमच्या उपकारांची परतफेड करतात . विकास कामांचा खेळ खंडोबा झालेला असतो . मग पुढच्या पाच वर्षासाठी आणखी कुणाच्या ओळखीतला निवडून येतो आणि पुन्हा तेच . हे असा चक्र वर्षानुवर्षे असंच सुरू आहे . थांबायचं नावंच घेत नाही . कारण आम्ही मतदार काही समजूनच घेत नाही . जेव्हा मतदान हे हक्क म्हणून प्रत्येक नागरिक करू लागेल , तेव्हा नक्कीच क्रांती घडेल . नाहीतर पुढची चार वर्षे शांती आपल्या पाचवीला पूजलेली आहेच . चार वर्षे मुद्दाम म्हणतोय , कारण पाच वर्षातल्या शेवटच्या एका वर्षात हे नगरसेवक काम करतातच , हा प्रत्येक नागरिकाचा अनुभव आहे . ह्या एका वर्षाच्या कामावर आम्ही मतदान करतो . केवढा हा आमच्या मनाचा मोठेपणा . केवढी हि उदार वृत्ती . बिचाऱ्या त्या नगरसेवकांचे डोळे पाणावून जातात , हे आपलं त्यांच्याप्रती प्रेम पाहून आणि त्या एका दिवसासाठी ते आपले कायमचे ऋणी राहतात . हक्काने पुढच्या वर्षी आपल्या दारात मत मागण्यासाठी उभे राहतात . मतदान हा आपला हक्क आहे , कि लाचारी ? असा प्रश्न पडल्याखेरीज रहात नाही . आपण मतदान करून यांच्यावर उपकार करतो , कि आपल्या जीवावर हे निवडून येऊन आपल्यावर उपकार करतात , हेच मुळी समजत नाही .

        आमचा देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आम्ही गर्वाने सांगतो . याच लोकशाहीतले कित्येक तरुण हे मतदानापासूनच वंचित आहेत , हे या लोकशाहीचे वास्तव . आमच्याकडे काही व्यवस्थाच नाहीत , वाढणाऱ्या लोंढ्यांच्या नोंदी नाहीत . मुळात आमच्याकडे काही नवीन करायची , पुन्हा क्रांती घडवायची इच्छा शक्तीच नाही .


          मतदान , नावातच दान आहे . आपण हे दान उमेदवारांच्या झोळीत टाकतो , तेव्हा कुठे हे निवडून येतात . या लोकशाहीत हे महत्वाचे दान करणारे आपण प्रत्येकजण राजे आहोत . कोणाला निवडून आणायचे हा निर्णय सर्वस्वी आपला आहे . ते उभे राहणार आणि आम्ही निवडून द्यायचं . बस झाला हा पूर्वापार सुरु असलेला खेळ . कोणी पात्र उमेदवार नसेल तर मतदानाला न जाण्याची सवय आता मोडा . निवडणूक आयोगाने NOTA चा पर्याय आपल्यासमोर ठेवला आहे . तेव्हा मतदान करा . तो आपला अधिकार आहे .

           

         

sumit baviskar

Hi...sir...i want to contact with you...if you possible plz text me on whatsapp...7774008818