** आई-वडील आणि वृद्धाश्रम ...... **

Started by विजय वाठोरे सरसमकर, February 24, 2017, 09:26:17 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर





आई ,जी आपलं सार काही सुख आपल्या मुलांमध्ये पाहत असते .
आपल्या मुलांना ती फुलापरी सांभाळत असते .कितीही काम असो ती आपल्या मुलांसाठी मात्र त्यांच्या अश्यक्य अशा आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिनरात झटत असते .वडील जे सर्व काही जग आपल्या मुलांना मानतात .लहानपणापासून अगदी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत ,एवढच नाहीतर प्रत्येक क्षणी त्यांच्या म्हणेल त्या हट्टाचा पाठपुरावा करणारे .
पण आई वडील यांना न दुखवता त्यांच्याशी सल्लोख्याने राहणारे कुटुंब क्वचितच पाहायला मिळतात .अगदी माझ्या अनुभवातही असे बरेचसे किस्से आहेस जे मी सांगितले तर नक्कीच डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत .
एके दिवशी मी स्टेशनहुन घराकडे येत होतो रस्त्यात एक आजीबाई भेटल्या ...
आजी : सायब लय भूक लागलीय ..काई खाण्यासाठी पैसे द्या कि ?
मी : आजी दिले मी पैसे तुमाला पण तो तुमचा आताचा प्रश्न मिटेल ..पुढचं काय ..
कुठं राहता तुम्ही ? तुमचे घर नाही काय ?
आजी : बापू आता तुला कसं सांगू लेका ..
घर हायबी अन नायबी ...
मी : असं का बर ?
आजी : ज्या लेकरांना मी माझ्या हिस्याची भाकरी दिली तेच बेईमान झालेत...
मी : कोणतं गाव तुमचं ?
आजी : गाव बिव काही इचारू नको बाबा ..
तशी सांगून काही फायदा नाय अन तोटा नाय
मी : तुमि तुमच्या मुलांकडे राहत नाही का ..?
आजी : माझे दोन मुलं आहेत .एक डॉक्टर हाय अन दुसरा मास्तर हाय ...
अन माझे पती गेले स्वर्गलोकी.....
मी: मग तुमि कुणाकडे राहता ..?
आजी: कुणाकडे म्हणजे कुणाकडेच नाही राहत ....
कारण माझ्या डॉक्टर मुलाला मी एक ओझं वाटते ,अन त्याच्या बायकोला बिनकामी अन गच्छाळ वाटते ....
म्हणून त्यांना कशाला माझा त्रास म्हणून मी निझाले आपली वृद्धाश्रम शोधायला ....
मी : आणि तुमच्या दुसऱ्या मुलाकडे का नाही राहत ...?
आजी : तो मास्तर व्हय....त्याला तर वेळच नसतो माझ्यासाठी ,त्याची बायकोही क्षण क्षणाला हिस-किस करत असते मला ...
म्हणते मला खायला भेटतं न मग खायचं गप गुमान ..अन पडून राहायचं
शिळ्या भाकरी अन चटणी खाऊन कंटाळा आला अन चावत पण नाही म्हणून त्या सुनबाईला थोडी नरम भाकरी तरी दे म्हणलं तर म्हणते मला ... तोरा तर पहा ,,काम ना कवडीचं पण खाणं मात्र नरम-गरम पाहिजे म्हातारीला ...
अन यावरूनच भांड-भांड भांडली ती , तो मास्तरही काहीच म्हणेना तिला ....मग काय तीन काढलं मला घराबाहेर ....

         हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून टचकन पाणी गळालं.....त्या आजीबद्दल आपुलकी वाटली ..त्यांना मी एका वृद्धाश्रमात सोडून आलो..

आता सोसायचं बळ नाई र लेका माझ्यात
तुझ्या हरकतीतून अन बोलण्यातून
सार काही मला कळलंय
माझ्यामुळे होतोय तुला त्रास
अन मी झाले आता भुईला भार
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
नात्या-गोत्यांच्या या
बंधनातून मुक्त होऊन
माझं म्हणायचं असं काही
तू ठेवलंच नाहीस आता
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
भेटावं वाटलंच तर ये
भेटेल मी कोण्यातरी वृद्धाश्रमात
अशीच आपलं जीवन जगण्यासाठी
कुटके मोडत असेन मी वृद्धाश्रमात
तू दिलेल्या दुःखाचं
मी बांधलाय आता गाठोडं
अन त्यांना जाता जाता
देईन मी नदीत सोडून
खूप काही आशा होत्या रे अजून
अन अनंत स्वप्न रंगविली होती
बहुतेक ईश्वराला मान्य नसतील
म्हणून चाललेय तुझं सोडून सार .....
म्हणून चाललेय तुझं सोडून सार ......

समाजात चालू झालेल्या या प्रथेला म्हणजेच आई वडिलांना वृद्धाश्रमात धाडाण्याला कुठे तरी आळा बसला पाहिजे .असं कसं मन होत त्यांचं आपल्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडण्याचं..याबद्दल ऐकून अन बघून खूप थक्क होतो मी....
या साऱ्यात सुशिक्षितांचंच प्रमाण जास्त दिसतं, कि त्यांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडलं..पण अशिक्षित अन खेड्यात आजही एकत्र कुटुंब पद्धती अन आई-वडिलांचा मान राखला जातो.तिथे वृद्धाश्रमात धाडायचं सोडा पण आई-वडिलांचं मनही दुखावलं जात नाही .
पण असे काही महारथी आहेत कि त्यांना आई-वडिलांची परवाच नाही अन त्यांना शिड-शिड करत वृद्धाश्रमाचा रास्ता दाखवतात ..
महाराष्ट्रात वृद्धाश्रमाचा दृष्टीने बघता त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे .हि सद्यस्थितीची खूप मोठी शोकांतिका आहे .पण हे सार काही आता बदलायला हवं .सर्वांनीच आपापल्या आई-वडिलांना काळजीपूर्वक वागविले पाहिजे ,त्यांना सुखी ठेवलं पाहिजे .
घरात आजी-आजोबा असतील तर लहान मुलांवर चांगले संस्कारही पडतील अन त्यांनाही नातवंडांना घेळण्याचा ,बागडण्याचा आनंद मिळेल .आणि सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे सर्वच मुलींनी,सुनांनी आपल्या सासूला सासर्याला आपले आई वडील मानुन त्यांची सेवा करायला हवी ..




विजय वाठोरे सरसमकर
(साहिल )
९९७५५९३३५९
Vijaywathore0@gmail.com