एक प्रश्न

Started by Parshuram Sondge, February 26, 2017, 08:42:51 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

खूडून घ्यावीत हे दिवस
क्षितीजाच्या उरात
आणि
पसरत जाते वैराण रान
खुडलेल्या दिवसांचे.

आठवांचे ऋतू  बेफिकीरपणे
सजत राहतात.
चक्क  डोळ्यात देखत.
चिरलेल्या काळजात.
आता त्या क्षणभंगूर ...
स्वप्नांचे सुंदर गाणं मी
कशाला गाऊ?

अंधारलेल्या वाटा..
आणि पुसत जातात
पहाट रंगात बुडत जाणा-या दिशा ही.
अभाळ शिवून काढण्याचा
तूर्तास इरादा नाही.
हे झालं माझं....
पणृ 
ती विद्रूप ...
आणि खंगलेली म्हतारी
तुटक्या झोपडीत
फाटक्या गोधडीला टाके घालत
प्रकाशाचं गाणं
का गात असेल ?
                  परशुराम सोंडगे ,पाटोदा
                      9673400828
                      दि.26.2.2017
Pprshu1312

Poornima kore