कष्टकरी

Started by Asu@16, February 26, 2017, 05:57:50 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     कष्टकरी

भर दुपारी बांधावरती
कडूनिंबाच्या झाडाखाली
श्रमजलधारा अंगावरती
झुळूक येता अंग मखमली
स्वर्गासम वाटे धरती
जमले सगळे घेऊन शिदोरी
लसूण-चटणी, कांदा भाकरी
सोबतीला आचार नवा
घास देऊन भूमातेला
मिळून म्हणती अमृत जेवा
तिजोरी ना जमीनजुमला
गाडी घोडा नाही बंगला
लपविला खोपटी अनमोल ठेवा
अनुभव घेण्या जगावेगळा
कष्टकऱ्याचा जन्म हवा

- अरुण सु.पाटील  :lamp:

https://www.facebook.com/AsuChyaKavita