स्त्री जन्माची कथा

Started by Asu@16, March 08, 2017, 10:02:09 AM

Previous topic - Next topic

Asu@16

   स्त्री जन्माची कथा

लोक निंदेस्तव त्यजिले मजला
हाच तुझा विश्वास
क्षणैक वाटले तुला सांगते
सोडून द्यावा श्वास
रघुवंश पोटी होता म्हणुनि
आवरले मी मना
काय माझा गुन्हा
म्हणून ही शिक्षा पुन्हा पुन्हा
भ्रष्टिले मज देव इंद्राने 
शापियले पती गौतमे
शिळा होऊनि वाट पाहिली
उध्दरिण्या पुरूषोत्तमे
पदस्पर्शाने तव पुनित जाहले
रामा रघुनंदना
काय माझा गुन्हा
म्हणून ही शिक्षा पुन्हा पुन्हा
पाच शूरांची पत्नी असुनि
अवहेलना ही पदोपदी
वस्त्रहरणाच्या अपमाने मी
वाहिली अश्रूंची नदी
नशीब म्हणून लाज वाचली
धावून येता कान्हा
काय माझा गुन्हा
म्हणून ही शिक्षा पुन्हा पुन्हा
स्त्रीजन्माची लज्जित कथा ही
युगा युगांची व्यथा
व्यथा कथावि सांग कुणाला
कुणा करू प्रार्थना
देऊन जन्म नरजातीला
उगा सोडिला पान्हा
काय आमुचा गुन्हा
म्हणून ही शिक्षा पुन्हा पुन्हा

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita