गाडी चालवण्याची सवय नडली

Started by कदम, March 08, 2017, 05:27:28 PM

Previous topic - Next topic

कदम

गाडी चालवण्याची सवय ती  नडली.

रस्ता मागे मागे सरसावत
होती गाडी भरधाव धावत
शहारे अंगावरती वारा झोंबत
डोळयात पाणी थेंबे थेंबे साठवत

रहदारी कमी मार्गी
नाक्या वर ती भलती
तेवढी सोडून खंत ती
अशी एक भ्रमंती
गाडी ऑन टाॅप गिअर

एक्सप्रेस वरतो टाॅप गिअर
प्रवास करून हेलमेट वेअर
पट्टीचा मी राईडर होतो
जोमाने वेग वाढवत होतो
गाडी ऑन टाॅप गिअर.....

छोटे मोठे ओवर टेक
अलगद देत वेगाला ब्रेक
वळणा वरचे झुकावे घेत
स्फुर्ती वेगळीच अनुभवत
गाडी ऑन टाॅप गिअर....

सूखी मार्ग क्रमण हे
दुःखी वळण एक घेता ते
रस्ता तो बरबटलेला
खड्डया खडकांनी भरलेला
डोन्ट नो ऑन विच गिअर...

मातीचा तो मुलायम पट्टा
कचकन ब्रेक येता दगडाच्या कडा
सामसूम वाटेत ते सुबाभळीचे काटे
चाकीला जवळून चाटे
आय थिंक फस्ट गिअर

थोडा वाढवला गिअर
वेग ही आत्ता
घेवून पंक्चर चे फिअर
अरूंद त्या कडेचा मार्गी
ज्यात दगड  धोंडे वर्ग
आय थिंक सेकंड गिअर...

कळस नजरेला मंदिराचा
वेग वाढवला प्रवासाचा
खडखडखड मडगार्ड झाले
डोक्यात अशी सनकी चढली
गाडी चालवण्याची सवय ती  नडली