II सगळं मोकळं मोकळं , कसं आगळं येगळं II

Started by siddheshwar vilas patankar, March 10, 2017, 07:16:50 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

सगळं मोकळं मोकळं

कसं आगळं येगळं

नाही भिंतींचा तो वेढा

नाही संसाराचा राडा

सुट्टीवर राघू मैना

सुखे जीवनाचा गाडा II

सडा शिंपला शिंपला

शब्द ओवींत गुंफला

जात्यामंधी दाणा टाकून

चुलीवर तो शेकला II

धनी न्हाऊन न्हाऊन

सोन्यावाणी लेई ऊन

सूर्य तळपे माथ्यावर

घेई शिदोरी खांद्यावर II

वाघ चालला चालला

बघा माझा डौलदार

बैल पारजती झाडांसंगे

दोन शिंगं धारदार II

भाळी कुक्कु माझं भारी

अंगणी तुळस हिरवीगार

हरानावणी हुंदडती

गायी वासरं ती न्यारी II

इवला संसार तो माझा

माझ्या चुलीची मी राणी

स्वर्गावाणी घर माझं

कोण नाय माझ्यावाणी II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C